आपत्ती निवारण दिनानिमित्त महापालिका विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला स्पर्धा

नवी मुंबई ः जागतिक आपत्ती धोके निवारण दिन निमित्त मुलांमध्ये आपत्ती निवारण उपाययोजनांविषयी जागरुकता निर्माण व्हावी. त्या अनुषंगाने त्यांनी याविषयी विचार करावा, विविध माध्यमांतून माहिती संकलित करावी. तसेच आपल्या ज्ञानाची आणि संकल्पनांची मांडणी करावी यादृष्टीने नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने महापालिका शालेय स्तरावर चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिका शाळांमधील इयत्ता ५ वी ते ८ वी या प्राथमिक स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घ्ोतला. त्यामधून शाळा क्र.३३ पावणे येथील विद्यार्थिनी सिरजना रमेश सिंह हिने प्रथम, शाळा क्र.४८ दिवा येथील विद्यार्थिनी मयुरी मच्छिंद्र मढवी हिने द्वितीय आणि शाळा क्र.३५ येथील विद्यार्थिनी श्रेया संतोष करंदकर हिने तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकाविला. तर शाळा क्र.७२ कोपरखैरणेचा विद्यार्थी विकास दिलीप पाल यास उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

इयत्ता ९ वी आणि १० वी या माध्यमिक स्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत शाळा क्र.१०३ ऐरोली येथील विद्यार्थिनी हर्षदा मोहन हारुगडे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तर शाळा क्र.१११ तुर्भेस्टोअर येथील विद्यार्थिनी शिवानी वि्ील पवार द्वितीय आणि शाळा क्र.१२१ कुकशेत येथील विद्यार्थी निखिल तिवारी तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला. गायत्री दत्ताराम देवळेकर या शाळा क्र.१०१ शिरवणेच्या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते विष्णुदास भावे नाट्यगृहात बालदिनी संपन्न झालेल्या स्वच्छ बाल महोत्सव प्रसंगी चित्रकला आणि निबंध स्पर्धेत सहभागी गुणवतं विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जलतरणातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल