जेएनपीटी ट्रस्टी विश्वस्त पदाच्या दोन जागांसाठीची निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न

उरण : भारतातील महत्वाच्या बंदर पैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील महत्वाचे बंदर असलेले जेएनपीटी (जेएनपीए) च्या ट्रस्टी (विश्वस्त )पदाच्या दोन जागांसाठी 15 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.  जेएनपीए मध्ये 652 कामगार कार्यरत असून त्यापैकी 647 कामगारांनी मतदान केले.या कामगारांनी  2 द्रस्टी निवडून दिले आहेत.कामगारांच्या हितासाठी झटणारे म्हणून ओळख असलेले रविंद्र रामदास पाटील व दिनेश पाटील यांनी ही निवडणूक जिकंली आहे.कामगार वर्गाचा विश्वास संपादन करत या दोन ट्रस्टीना कामगारांनी निवडून दिले आहे.रविंद्र पाटील व दिनेश पाटील विजयी झाल्याची बातमी मिळताच कामगार वर्गांनी व ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत आंनंदोत्सव साजरा केला.

जेएनपीए विश्वस्त (ट्रस्टी )पदाची निवडणूक कामगार संघटनांनी प्रतिष्ठेची केली होती.या निवडणूकीत 4 कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.जेएनपीटी कामगार एकता संघटना तर्फे दिनेश पाटील , न्हावा शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटना तर्फे कॉम्रेड भूषण पाटील,जेएनपीटी वर्कर्स यूनियन तर्फे रविंद्र रामदास पाटील , न्हावा शेवा पोर्ट अँण्ड जनरल वर्कर्स यूनियन या मान्यता  प्राप्त चार संघटना व त्यांचे नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. निवडणुकीत 652 कामगार पैकी 647 कामगारांनी मतदान केले. त्यामध्ये जेएनपीटी कामगार एकता संघटना तर्फे उभे असलेले उमेदवार दिनेश पाटील यांना 291मते,जेएनपीटी वर्कर्स यूनियन तर्फे रविंद्र रामदास पाटील यांना 161 मते,न्हावा शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटना तर्फे कॉम्रेड भूषण पाटील यांना 143 मते,न्हावा शेवा पोर्ट अँण्ड जनरल वर्कर्स यूनियनला 52 मते मिळाली. जेएनपीए च्या विश्वस्त पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते दिनेश पाटील यांना मिळाली असून त्यानंतर रविंद्र पाटील यांना  , त्यानंतर कॉम्रेड भूषण पाटील यांना व सर्वात कमी मतदान न्हावा शेवा पोर्ट ऍण्ड जनरल वर्कर्स युनियनला मिळाले.या निवडणुकीत प्रथम क्रमांकावर दिनेश पाटील, द्वितीय क्रमांकावर रविंद्र पाटील, तृतीय क्रमांकावर कॉम्रेड भूषण पाटील तर चौथ्या क्रमांकावर न्हावा शेवा पोर्ट ऍण्ड जनरल वर्कर्स युनियन होती.

तीन वर्षापूर्वी जेएनपीटी ट्रस्टी (विश्वस्त) पदाच्या निवडणुकीत निवडून आलेले दोन कामगार विश्वस्तांचे मार्च 2022 पर्यंत देण्यात आलेली एक वर्षाची मुदत वाढही संपली होती . त्यानंतर दोन कामगार ट्रस्टी पदासाठी निवडणूक होणे अपेक्षित होते.2 ऑगस्ट रोजी गुप्त मतदान पद्धतीने  निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. बंदरातील 500 कामगांरांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने आता फक्त 652 कामगार कार्यरत आहेत.ट्रस्टी पदाच्या 2 जागांसाठी जेएनपीटी कामगार एकता संघटना, न्हावा शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटना, जेएनपीटी वर्कर्स यूनियन, न्हावा शेवा पोर्ट अँण्ड जनरल वर्कर्स यूनियन या मान्यता  प्राप्त चार संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या .प्राधिकरण स्थापना झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक झाली असल्याने या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते..त्यामुळे ही निवडणूक अटी तटीची झाली .या निवडणूकीत जे. एन. पी. टी वर्कर्स यूनियनचे रविंद्र पाटील, जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे दिनेश पाटील यांना प्रचारा दरम्यान  विविध सामाजिक संस्था,संघटनेचा, ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला होता.रविंद्र पाटील, दिनेश पाटील हेच विश्वस्त पदावर निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास कामगार, ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी व्यक्त केला होता. आणि कामगारांचा हाच विश्वास, प्रेम सत्यात उतरले. कामगारांनी शेवटी रविंद्र पाटील, दिनेश पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आपत्ती निवारण दिनानिमित्त महापालिका विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला स्पर्धा