व्यापारी व कामगारांवर येणा-या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी एकसंघ शक्तीने प्रश्न सोडविता येतील - नरेंद्र पाटील

नवी मुंबई :- कष्टकरी माथाडी कामगारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व्यापार आणि काम वाढले पाहिजे, त्यासाठी व्यापारी, बाजार समिती, कामगार व अन्य घटकांनी एकसंघ रहाणे गरजेचे आहे, व्यापारी व कामगारांवर येणा-या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार संघटनेने सतत पुढाकार घेतला आहे, आपल्या एकसंघ शक्तीने शासनाकडून आपले प्रश्न सोडविता येतील, असे उद्गार महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार व शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल एपीएमसी मसाला मार्केटमधील तमाम माथाडी कामगार, वारणार, व्यापारी, पालावाला महिला कामगार व अन्य घटकांच्यावतिने बुधवारी पाटील यांचा सत्कार  करण्यात आला होता, त्यावेळी नरेंद्र अण्णासाहेब पाटील बोलत होते., एपीएमसी मार्केट आवार व इतर ठिकाणी कामे कमी झाल्यामुळे माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियातील सदस्य व्यवसाय करीत आहेत, अशा लघु उद्योगाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल, कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार केंद्रबिंदू मानून माथाडी कामगार व मराठा समाजासाठी कार्य करीत रहाणार असे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खंडणीसाठी तळोजा भागातील ऑईल विक्री व्यवसायीकासह त्याचा मुलगा व भावावर प्राणघातक हल्ला