एकाच वेळी नातेसंबधांतील आगरी समाजाचे सात-आठ लग्न एकाच ठिकाणी

वाशी ः आगरी समाजात लग्नामध्ये मोठा खर्च होत असतो. आजच्या महागाईच्या जमान्यात लग्न खर्च करताना कधी-कधी पालकांना कर्जाच्या खाईत जावे लागते. त्यामुळे लग्न खर्च कमी करण्याच्या हेतूने आपल्या संस्कृतीनुसार रीतपरंपरा पाळून ‘सामुदायिक विवाह'चा एक विकल्प समोर येत आहे. आगरी समाज प्रबोधन संस्था, डोंबिवली या सेवाभावी संस्थेने यासाठी पुढाकार घ्ोतला असून, आगरी समाजाचे सामुदायिक विवाह पार पाडले जात आहेत.

आगरी समाजातील लग्न म्हणजे वधु-वर पित्याच्या डोक्यावर खर्चाचा भार. त्यात समाजातील प्रतिष्ठा राखण्यासाठी कर्ज काढून लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर काही वधू-वर पित्यांचे अर्धे आयुष्य कर्ज फेडण्यात गेले आहे. मात्र, लग्न खर्चाचा पसारा कमी व्हावा आणि आपल्या संस्कृतीचेही जतन व्हावे, या हेतुने आगरी समाज प्रबोधन संस्था, डोंबिवली या सेवाभावी सामाजिक संस्थेने सामुदायिक विवाह सोहळ्याचा विकल्प पुढे आणला आहे. त्यासाठी आधी आगरी समाजाचा परिचय मेळावा पार पाडला जातो. त्यामध्ये इच्छुक वधु-वरांची नावे नोंदवली जातात. त्यानंतर एक मोठा मुहूर्त पाहून सामुदायिक विवाह पार पाडले  जातात. संस्थेचे सर्व कार्यकर्ते या विवाहात अगदी घरातील समारंभ असल्यासारखे कोणाचेही कार्यवाहकच होतात. या सामुदायिक विवाह सोहळ्यात फार मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, खर्च नाममात्र होतो. या सोहळ्यात एकाच वेळी नातेसंबधांतील सात-आठ  लग्न एकाच ठिकाणी होत असल्याने वऱ्हाडींची धावपळ होत नाही. त्यामुळे आगरी समाजाने जिथे जिथे राहत असाल, त्या शहरात, गावा-गावात सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन समाजसेविका अंजलीताई भोईर यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्यापारी व कामगारांवर येणा-या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी एकसंघ शक्तीने प्रश्न सोडविता येतील - नरेंद्र पाटील