मान्यता प्राप्त चार संघटना निवडणुकीच्या मैदानात

उरण : भारतातील महत्वाच्या बंदर पैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील महत्वाचे बंदर असलेले जेएनपीटी (जेएनपीए) च्या ट्रस्टी (विश्वस्त) पदाच्या दोन जागांसाठी 15 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक होणार आहे. सध्या जेएनपीए मध्ये 652 कामगार असून हे कामगार 2 ट्रस्टी निवडून देणार आहेत. ही निवडणूक कामगार संघटनांनी प्रतिष्ठेची केली असून या निवडणूकीत 4 कामगार संघटना सहभागी असून जेएनपीटी वर्कर्स यूनियनचे रविंद्र रामदास पाटील हे विश्वस्त पदाच्या शर्यतीत असून जे.एन.पी.टीच्या विश्वस्त पदासाठी जे.एन. पी.टी वर्कर्स यूनियनचे रविंद्र पाटील यांना दिवसेंदिवस कामगारांचा व विविध गावातील नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. कामगार वर्गाने व ग्रामस्थांनी रविंद्र पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा आत्मविश्वास प्रचारा दरम्यान बोलून दाखविला.

तीन वर्षापूर्वी जेएनपीटी ट्रस्टी (विश्वस्त) पदाच्या निवडणुकीत निवडून आलेले दोन कामगार विश्वस्तांचे मार्च 2022 पर्यंत देण्यात आलेली एक वर्षाची मुदत वाढही संपली आहे. त्यानंतर दोन कामगार ट्रस्टी पदासाठी निवडणूक होणे अपेक्षित होते. 2 ऑगस्ट रोजी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. बंदरातील 500 कामगांरांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने आता फक्त 652 कामगार कार्यरत आहेत. ट्रस्टी पदाच्या 2 जागांसाठी जेएनपीटी कामगार एकता संघटना, न्हावा शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटना, जेएनपीटी वर्कर्स यूनियन, न्हावा शेवा पोर्ट अँण्ड जनरल वर्कर्स यूनियन या मान्यता प्राप्त चार संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.प्राधिकरण स्थापना झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक अटी तटीची होणार आहे.या निवडणूकीत जे.एन.पी.टी वर्कर्स यूनियनचे रविंद्र पाटील यांना दिवसेंदिवस विविध सामाजिक संस्था,संघटनेचा पाठिंबा मिळत असून रविंद्र पाटील हेच विश्वस्त पदावर निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास कामगार, ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी व्यक्त केला आहे.

जेएनपीए कामगार प्रतिनिधी निवडणूक 2022 जाहिर झाली असून सदर निवडणूक 15 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या निवडणूकी द्वारे कामगार प्रतिनिधीची कार्यकारी मंडळावर पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवड होणार आहे. जे. एन. पी. टी वर्कर्स यूनियनचे उमेदवार रविंद्र रामदास पाटील यांनी आजपर्यंत कामगारांच्या अनेक समस्या सोडविल्या असून विविध समस्या संदर्भात कामगारांचे उत्तम नेतृत्व त्यांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात कामगारांचा विश्वासही त्यांनी संपादन केला आहे. त्यामुळे रविंद्र पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्ह्याच्या ४७८.६३ कोटींच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी