हॉटेल्स, शाळा, सोसायट्या, मार्केट, शासकीय कार्यालये, हॉस्पिटल स्तरावर ‘स्पर्धा'चे आयोजन

नवी मुंबई ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महापालिका मार्फत राबविण्यात येत असलेले स्वच्छताविषयक विविध उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरिता तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता माहिती, शिक्षण, प्रसार आणि जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण आणि कचऱ्यावरील प्रक्रिया तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे तसेच या बाबींमध्ये सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील हॉटेल्स, शाळा (खाजगी, नमुंमपा), गृहनिर्माण संस्था, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये आणि हॉस्पिटल या प्रमुख सहा गटांमध्ये ‘स्वच्छता स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.  

या ‘स्वच्छता स्पर्धा'चे गुणांकन करण्याकरिता ठराविक निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने निर्मितीच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण (एदल्ीम एाुीाुीूग्दह), कचऱ्यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्थापन, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा आणि कोव्हीड-१९ या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या नियमांचे पालन अशा विविध बाबींवर भर देण्यात आलेला आहे.


‘स्वच्छता स्पर्धा'मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या हॉटेल्स, शाळा (खाजगी, नमुंमपा), गृहनिर्माण संस्था/Rेंीं, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये आणि हॉस्पिटल या संस्थांना ११ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहेत. या ‘स्वच्छता स्पर्धा'चे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण आणि गुणांकन दिनांक १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.

‘स्वच्छता स्पर्धा'मध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग अपेक्षित असून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता विभाग स्तरावरुन निवड करण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजा रुपये रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत.

‘स्वच्छ शाळा स्पर्धा'च्या दोन्ही गटांतील प्रथम आणि द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे १५ हजार आणि ११ हजार रुपये रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे ५१ हजार, ४१ हजार आणि ३१ हजार रुपये रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र तसेच ‘स्वच्छ शाळा स्पर्धा'च्या (खाजगी, नमुंमपा) दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या शाळांना अनुक्रमे २५ हजार, २१ हजार आणि ११ हजार रुपये रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ मार्केट स्पर्धा करिता प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या शाळांना अनुक्रमे २५ हजार, २१ हजार आणि ११ हजार रुपये रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.


‘स्वच्छता स्पर्धा'तील हॉटेल, शासकीय कार्यालय आणि हॉस्पिटल या विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी खाडी पुल; ‘सुसाईड पॉइंट' अशी ओळख