आश्विन काॅरी नगर मध्ये जाणाऱ्या  रस्त्याचे काॅक्रेटिंग करण्याचे काम सुरु 

नवी मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रबाळे एमआयडीसी भागात असलेल्या साईबाबा नगर जवळील  आश्विन काॅरी नगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे कांकरीटिकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच विजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेवक राम आशिष यादव, नवी मुंबई महापालिका प्रभाग-३ मधील कार्यतत्पर समाजसेवक गणेश दगडे, महेंद्र सावंत, चांद शेख, राज धावणे, संजय दगडे,  लक्ष्मण दगडे, बाळू जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ठाणे-बेलापूर एमआयडीसी भागातून जाणाऱ्या रोड पासून  आश्विन काॅरी नगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली होती. आश्विन काॅरी नगर मध्ये जाण्या-येण्याचा मार्ग नव्हता. असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे सदर रस्ता रहदारीसाठी दुतर्फा धोकादायक बनला होता. परिणामी या रस्त्याचे काॅक्रेटींग करुन रस्ता दुरुस्त करावा, असे साकडे स्थानिक नागरिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले  यांच्याकडे घातले होते. त्याची दखल घेऊन  ठाणे-बेलापूर एमआयडीसी भागातून जाणाऱ्या रोड पासून आश्विन काॅरी नगर मध्ये जाणारा रस्ता दुरुस्त करुन घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन विजय चौगुले यांनी आश्विन काॅरी नगर मधील स्थानिक नागरिकांना दिले होते. 

विजय चौगुले यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आश्विन काॅरी नगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे काॅक्रेटींग करण्याचे काम सुरु झाले आहे, असे समाजसेवक गणेश दगडे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरखैरणे ते आळंदी  पायी दिंडीचे प्रस्थान