मतदार नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम

विशेष संक्षिप्त पुनरिक्षणमध्ये मतदारांनी नाव मतदार यादीत समाविष्ट करावे -जिल्हाधिकारी शिनगारे

ठाणे ः ठाणे जिल्ह्यातील मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदारयादी मध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

पात्र मतदारांनी मतदारयादीत आपले नांव नोंदविण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप (न्न्प्ीं), ऱ्न्न्एझ् आणि न्न्दूीझ्दीूीत् या ऑनलाईन सुविधांचा वापर करावा. तसेच प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदारयादीतील आपला तपशिल अचुक आहे का याची खात्री करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मनुज जिंदल यांनी केले आहे.
दिनांक १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सदर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार सोनवणे, आदि उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी १९ आणि नोव्हेंबर २०२२ तसेच ३ आणि ४ डिसेंबर २०२२ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मतदारसंघातील मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये शहरी आणि निम शहरी भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने गृहनिर्माण सहकारी संस्थांचे सेक्रेटरी यांना मतदान केंद्र स्तरीय स्वयंसेवक (ँददूप् थनत् न्न्दत्ल्हूाी) घोषित केलेले आहेत. मतदार नोंदणी वाढविण्यासाठी मोठ्या सोसाट्यांच्या ठिकाणीही विशेष नोंदणी शिबिरासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले आहे.

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम काळात युवावर्ग, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या घटकांची नोंदणी वाढावी यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आदिवासी महिलांच्या नोंदणीसाठीही मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहापूर येथे विशेष शिबिर घ्ोण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत वय वर्षे १८-१९ वयोगटातील मतदार, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि दिव्यांग मतदारांनी सहभागी होऊन आपले नांव मतदारयादीत समाविष्ट करुन घ्यावे. याकरिता मतदारांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ चे अर्ज भरुन द्यावे किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए आणि व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉग-इन करुन आपले नाव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.

जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन...
मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नांव वगळणी, नवीन नोंदणी तसेच मतदार यादतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी आदि प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्यात, याकरिता आज १० नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसेभाचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष ग्रामसभेत प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादीचे वाचन होणार आहे. त्यानुसार मतदारयादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नावामध्ये दुरुस्ती, रहिवाशांचे स्थलांतरण विधानसभा अंतर्गत-बाहेरील, मतदार ओळखपत्र बदलून देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकीत करावयाचे असल्यास नमुना ८ तसेच आपले मतदार ओळखपत्राशी आधारकार्ड जोडणी करण्याकरिता नमुना ६-ब भरुन संबंधित मतदार आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉग-इन करुन संबंधित अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करुन विशेष मोहीम-विशेष ग्रामसभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ग्रामीण भागात मतदार नोंदणी वाढावी यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१२५०० नाट्यप्रयोगांचे विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांचा विशेष सन्मान