माथाडिंचे  प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील नेत्यांना  महाराष्ट्रात बोलावण्याची गरज- नरेंद्र पाटील

नवी मुंबई,-:कष्टकरी कामगारांसाठी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र सरकारकडून स्थापन केलेला कायदा देशातील संपुर्ण राज्यांना लागू झाला पाहिजे,त्याकरीता  आणि व्यापारी- उद्योजक व कष्टकरी माथाडी कामगारांचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील नेत्यांना मेळाव्यास महाराष्ट्रात बोलाविले पाहिजे, असे उद्गार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते  नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी काढले आहेत. 

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची राज्यशासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष पदी नेमणुक झाल्याबद्दल मंगळवार दि.८ नोव्हेंबर रोजी   नवीमुंबईतील एपीएमसी धान्य बाजारामधील  कै. आमदार अण्णासाहेब पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच या मार्केट आवारातील  माथाडी, वारणार, पालावाला महिला कामगार, ग्रोमा व ट्रान्सपोर्ट असोसिएशन, व्यापारी वर्ग व अन्य घटकांच्यावतिने सत्कार समारंभ आयोजित करून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, माथाडी कामगार हा माझा केंद्रबिंदू आहे. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य मी करीत आहे, दाणाबंदर मार्केटमधील सर्व घटकांनी माझा सत्कार केला, माझी जबाबदारी वाढलेली आहे, माथाडी कामगारांना न्याय देण्याबरोबर महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देवून मराठा युवकांना उद्योजक करण्याचा प्रयत्न मी सतत करणार आहे असे आश्वासन यावेळी  पाटील यांच्या  वतीने देण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भरतीवेळी २८९ हेवटर पाणजे पाणथळ क्षेत्र शुष्क