नवी मुंबई , मुंबईच्या घातक कचऱ्याचे उरण -पनवेल हद्दीतील सिडकोच्या जागांवर मानव निर्मित डोंगर

उरण : नवीमुंबई , मुंबईच्या घातक कचऱ्याचे उरण -पनवेल हद्दीतील सिडकोच्या जागांवर मानव निर्मित डोंगर तयार केल्यानंतर रहदारीच्या रस्त्यावर टाकला जात आहे. असाच कचरा आत्ता थेट कचरा गव्हाण फाटा -दिघोडे रस्त्यावरच टाकला जात असल्याने रस्ता धोकादायक बनला असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई, नवीमुंबई शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कचरा माफीये गेली पाच वर्षे उरण परिसरात सर्किट झाले असून सदर शहरातील कचरा (डेब्रिज) हा उरण,उलवे पनवेल च्या सिडको हद्दीत टाकून लाखों रुपये हे सिडको, महसूल, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून कमवित आहेत.त्यामुळे जासई,वहाळ, गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे ( डेब्रिजचे ) डोंगर उभे रहात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. बेकायदेशीरपणे टाकण्यात येत असलेला कचरा (डेब्रिज) नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आणि प्रदुषणास कारणीभूत ठरत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात काही कचरा ( डेब्रिज) माफीये राजरोसपणे हजारो टन कचरा (डेब्रिज) हा  वहाल ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील खारफुटींवर तसेच खाडीच्या पाण्यात टाकत असल्याने खारफुटीची वने  नष्ट होऊन खाडीतील विविध जातींचे मासे संपुष्टात येऊ लागले आहेत.त्यामुळे प्रदुषणात वाढ होऊन मासेमारी करणाऱ्या बांधवांचे उपजिविकेचे साधन संपुष्टात येऊ लागले आहे.यासंदर्भात शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने त्याचा फायदा उठवत आत्ता तर हा कचरा( डेब्रिज) चक्क गव्हाण फाटा -दिघोडे या रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरील साईट पट्टीवर रात्री अपरात्री टाकला जात आहे.त्यामुळे रस्त्यावरील पाणी जाणारी स्त्रोत बुजविले जात आहेत.यामुळे

या मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भात अनेक वेळा तक्रार दाखल करुन आवाज उठविण्यात आला आहे. परंतु महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि सिडकोचे अधिकारी हे मी मारल्या सारखे करणार तू रडल्या सारखे कर या म्हणीप्रमाणे एकमेकांची पाठ राखण करीत आहेत.त्यामुळे अशा कचऱ्याच्या ( डेब्रिजच्या ) गंभीर समस्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर तसेच रस्त्यावर अपघात झाला तर संबंधित प्रशासनाला जबाबदार धरुन कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माथाडिंचे  प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील नेत्यांना  महाराष्ट्रात बोलावण्याची गरज- नरेंद्र पाटील