स्वीट होम ट्रस्ट तर्फे पुरस्कार वितरण

नवी मुंबई : स्वीट होम ट्रस्ट, नवी मुंबई या सेवाभावी, सामाजिक संस्था तर्फे वीर तानाजी आणि झाशीची राणी पुरस्कार वितरण सोहळा ६ नोव्हेंबर रोजी वाशी मधील मराठी साहित्य मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. 

या समारंभात सामाजिक,  उद्योग, कला यांसह अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन स्वतःचे कर्तृत्व सिध्द करणाऱ्या  कर्तृत्ववान महिलांना झाशीची राणी आणि पुरुषांना वीर तानाजी पुरस्कार प्रदान करुन स्वीट होम ट्रस्ट तर्फे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे या  सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना घोड्यावर बसून फोटो काढण्याची   संधी देण्यात आली.

या कार्यक्रमात नवी मुंबईतील प्रसिध्द फिल्म डायरेक्टर मिलिंद एस. पी., डॉ. स्नेहा देशपांडे,  समाजसेविका राजश्री येवले, पत्रकार कृष्णा यादव, समाजसेविका दर्शना भोईर, दत्तात्रय चौगुले समाजसेविका दर्शना भोईर याच्या हस्ते सत्कारमूर्तींना वीर तानाजी पुरस्कार आणि झाशीची राणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमास 'परिवर्तन फाउंडेशन'चे अध्यक्ष प्रतीक यादव, मराठी फिल्म डायरेक्टर अविनाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक