सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानाचा उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध

उरण : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतप्त प्रतिकिया उमटले असून सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. उरण तालुक्यात उरण शहरातील बाझारपेठेतील महात्मा गांधी चौकात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध करण्यात आला.

सोमवारी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने आज राज्यभर सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्याचाच एक भाग म्हणून उरण तालुक्यातही निदर्शने करून सत्तार यांचा निषेध करण्यात आला. या बाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये तीव्र संतापाची लाट कायम आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, महिला सरचिटणीस कुंदा ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष -एडव्होकेट भार्गव पाटील, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुतार, रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष समाधान म्हात्रे, तालुकाध्यक्ष मनोज भगत, कार्याध्यक्ष रमण कासकर, उरण तालुका सरचिटणीस प्रकाश म्हात्रे, उरण तालुका उपाध्यक्ष कलावती भोईर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश कांबळे, शहराध्यक्ष गणेश नलावडे,पुष्पा म्हात्रे, रेश्मा म्हात्रे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीवुडस्‌ मध्ये सातत्याने कोसळताहेत घरांच्या स्लॅबचे प्लास्टर