रबाळे एमआयडीसी मध्ये विना परवाना डेब्रिज वाहतूक

वाशी ः नवी मुंबई शहरात सुट्टीच्या दिवशी मोठया प्रमाणात विना परवाना डेब्रिज वाहतूक केली जात असून, नवी मुंबई शहरात टाकण्यात येत असलेल्या ‘डेब्रिज'वरुन डेब्रिज वाहतूक रोखण्यात डेब्रिज भरारी पथकाला अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा रबाळे एमआयडीसी मध्ये दिसून आला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डेब्रिज, राडारोडाची वाहतूक करण्यासाठी त्याबाबत हद्द, रस्ता वापरण्यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहन क्रमांकाची यादी देऊन परिमंडळ निहाय परवानगी घ्यावी लागते. त्या परवानगीची एक प्रत डेब्रिज वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या काचेवर दिसेल अशा तऱ्हेने लावावी लागते. मात्र, रबाळे एमआयडीसी मधील गोल्डन गॅरेज समोरुन डेब्रिज भरावाची वाहतूक करणाऱ्या एका ठेकेदाराने महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता डेब्रिज वाहतूक सुरु ठेवली आहे. त्यामुळे विना परवाना डेब्रिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील यांनी केली आहे.

रबाळे एमआयडीसी मधील गोल्डन गॅरेज समोरील जागेवरील डेब्रिज वाहतूक करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नसून, त्या ठिकाणी स्थळ पाहणी करुन सदर डेब्रिज वाहतूक तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - वसंत बाविस्कर, अधिकारी - डेब्रिज विरोधी भरारी पथक, परिमंडळ-२, नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वीट होम ट्रस्ट तर्फे पुरस्कार वितरण