‘नेरुळ ब्लॉक काँग्रेस कमिटी'तर्फे गडकिल्ले बनविणे स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

नवी मुंबई ः ‘नेरुळ ब्लॉक काँग्रेस कमिटी'चे अध्यक्ष तथा ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी'चे सदस्य रवींद्र सावंत आणि ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी निमित्त ऐतिहासिक गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धा विविध ठिकाणी घेण्यात आल्या. सदर उत्कृष्ट उपक्रमातील गडकिल्ले स्पर्धेमध्ये ५ वर्षापासून ते १८ वर्ष वयोगटातील तब्बल १५० मुलांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण ६ नोव्हेंबर रोजी ‘काँग्रेस'च्या नेरुळ, सेवटर-२ मधील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलांनी मोबाईलच्या जगातून बाहेर पडून ऐतिहासिक गड-किल्ल्यांची माहिती घ्यावी यासाठी ‘नेरुळ ब्लॉक काँग्रेस कमिटी'च्या वतीने दिवाळी सणामध्ये नेरुळ मध्ये गडकिल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करुन रवींद्र सावंत यांनी स्वतः किल्यांची पाहणी केली. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जगदंब मित्र मंडळाने, द्वितीय क्रमांक जगदंब प्रतिष्ठानने तर तृतीय क्रमांक शिंदे ग्रुप यांनी पटकवला. सदर स्पर्धा बक्षीस वितरण समारंभप्रसंगी रवींद्र सावंत, विद्या भांडेकर,रामचंद्र माने, उत्तम पिसाळ, भानुदास शिंदे तसेच इतर कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सद्याच्या काळातील मुले मातीचे खेळ विसरत चालले आहेत. तसेच मातीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्यांची माहिती होण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे विद्या भांडेकर यांनी सांगितले. तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच मुलांनी हुबेहूब आकर्षक किल्ले साकारण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद होत असल्याचे रवींद्र सावंत म्हणाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एकाहून अधिक भाषा येणे हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य - प्रा. अब्दुस सत्तार दळवी