महिला कर्मचाऱ्यांना वाहतूक शाखा कार्यालयाच्या उद्‌घाटनाचा मान

कोपरखैरणे वाहतूक शाखेचे नुतनीकरण

कोपरखैरणे  : कोपरखैरणे वाहतूुक शाखेच्या डी-मार्ट येथे असलेल्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे कोपरखैरणे विभाग वाहतूक पोलिसांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याचाच विचार करुन कोपरखैरणे वाहतूक शाखेचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या नुतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्‌घाटन ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विशेष म्हणजे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी या उद्‌घाटनाचा मान वाहतूक शाखेतील दोन महिला कर्मचाऱ्यांना दिल्याने सर्वच उपस्थितांना आश्चर्याचा धवका बसला. यावेळी वाहतूक शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नैना'च्या २३ गावांमध्ये युडीसीपीआर लागू करावा- शेतकऱ्यांची मागणी