मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मराठी भाषा दिनी विविध पारितोषिकांचेही वितरण

नवी मुंबई ः मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन २६ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता दासावा, धुरू हॉल, पहिला मजला, दादर-पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे.

 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी, मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव हे उपस्थित राहाणार आहेत असे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी कळवले आहे. यावेळी संघाच्या वतीने घ्ोण्यात आलेल्या ४८ व्या राजस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार असून वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कार, मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घ्ोत इतिहास प्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवाव्रती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती ‘मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा, शाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा या विषयावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री तर कवयित्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव ‘केवल प्रयोगी' चे सादरीकरण सादर करणार आहेत. अंजुमन-ई -इस्लाम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान बोधवाहिनी उपक्रम
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आमदार निधीतून लवकरच बेलापूर मतदारसंघात सीसीटिव्हींचे जाळे -आ.मंदाताई म्हात्रे