लिनेस क्लब न्यू बॉम्बेने दिला सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रत्यय

लिनेस क्लब न्यू बॉम्बेच्या वतीने आदिवासी पाड्यावर वस्त्रे, चीजवस्तू वाटप

नवी मुंबई ः लिनेस क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाशीच्या सदस्यांनी २ फेब्रूवारी रोजी खारपाड्यापासून आठ कि.मी जवळ असलेल्या मोरबाल या आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील आदिवासी महिलांना १०० नवीन साड्या, चांगल्या स्थितीतील असलेल्या ५० साड्या, ड्रेस, पुरूषांचे-लहान मुलांचे कपडे, छोटे टॉवेल्स, कंगवे, खोबरेल तेलाच्या बाटल्या, तीळाचे लाडू, तीळाच्या वड्या यांचे वाटप केले. या प्रसंगी लिनेस डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मेरी जॉन, लिनेस डिस्ट्रिक्ट अँडव्हायझर छाया कारेकर, मॅक्रो स्टेटस्‌ आदिवासी प्रमुख स्मिता वाजेकर,  डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन आदिवासी प्रमुख अंजली पाटील, मॅक्रो स्टेटस मेंबर डॉ मिना देव, लॉरीन, वाशी लिनेस क्लब प्रेसिडेंट मिना दरवेश, लायन रुबी प्रेसिडेंट सुमन शिंगला, क्लब मेंबर्स स्नेहा चांदोरकर, भाग्यश्री सिंग, नीता माधव याही उपस्थित होत्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सेक्सरॅकेट चालविणा-या टोळीतील दलालाला अटक ; त्याच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका