यशस्वी वाटचालीचे सारे श्रेय सेवाभावी वृत्तीने काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना

नमुंमपा परिवहन उपक्रमाचा 27 वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा

     नवी मुंबई : प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याची बांधिलकी जपत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असल्याने एनएमएमटी प्रवासी सेवेबद्दल
नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना असून यापुढील काळात उपक्रम अधिक उत्तम कामगिरी पार पाडेल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे आयोजित वर्धापनदिन समारंभात मनोगत व्यक्त करताना त्यांनी एनएमएमटी कर्मचा-यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

       याप्रसंगी भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी करिष्मा नायर, प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र इंगळे, परिवहन
उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, मंगला माळवे, अनंत जाधव तसेच सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, कार्यकारी अभियंता विवेक अचलकर, मुख्य वाहतुक अधिकारी अनिल शिंदे, प्रशासन अधिकारी  दिपिका पाटील, वाहतुक अधिक्षक सुनिल साळुंखे व उमाकांत जंगले आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

       परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी उपक्रमातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी एनएमएमटी परिवाराचा हक्काचा सदस्य असल्याची भावना व्यक्त करीत आपण एकमेकांच्या सहयोगाने काम करतो त्यामुळे केंद्र
सरकारमार्फत 15 व्या अर्बन मोबॅलिटी इंडिया उपक्रमांतर्गत एनएमएमटीला देशातील सर्वोत्तम वाहतुक सेवेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. उपक्रमाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचे सारे श्रेय सेवाभावी
वृत्तीने काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना देत योगेश कडुसकर यांनी यापुढील काळात असेच चांगले काम करून परिवहन उपक्रमाचा नावलौकीक उंचावत नेऊया, असे आवाहन केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘शून्य प्लास्टिकचा प्रारंभ माझ्यापासून’ उपक्रमांतर्गत 962 किलो प्लास्टिक जमा