चिर्ले येथील आई एकविरा माऊली महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकु कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

हळदी कुंकू कार्यक्रमाच्यानिमिताने महिलांना मिळाले विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन 

पनवेल:  चिर्ले येथील आई एकविरा माऊली महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकु कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त शितल कुलकर्णी यांनी ई श्रम कार्ड व घरेलू कामगारांची नोंदणी व त्याचे असणारे लाभ याबाबत माहिती दिली. तर कामोठे पोलिस स्टेशनच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी उपस्थित महिलांना कायदे व महिलांचे अधिकार याविषयी माहिती दिली. तर डॉ. सिद्धी घरत यांनी स्त्री रोगावर व अॅड. राणी म्हात्रे यांनी कायदे विषयक मार्गदर्शन केले.

          या कार्यक्रमात मेडीकल असोसिएशन उलवे अध्यक्षा सिमा पाटील, करळच्या सरपंच अनिता तांडेल, चिर्ले ग्रामपंचायतीच्या सदस्या अस्मिता पाटील,  प्राजक्ता गोंधळी, रोशनी मोहिते, रंजिता पाटील, रंजना मढवी, सुवर्णा घरत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथेप्रमाणे हळदी कुंकु कार्यक्रमामध्ये स्त्रिया एकत्र येवून एकमेकींना हळदी कुंकु लावून एखादी छोटी भेटवस्तू देवून हा कार्यक्रम पुर्ण होतो.  मात्र मंडळाच्या अध्यक्षा वर्षा प्रेमकुमार घरत यांनी महिलांच्या मनोरंजनासाठी खास खेळ पैठणीचा व अनेक वेगवेगळे खेळ यानिमित्ताने आयोजित केले होते. वर्षा घरत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला मान्यवरांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करून त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना कसा होईल याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात तसेच अनेक प्रकारची बक्षिसे व सर्व महिलांना भेटवस्तु देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा घरत, सोनाली ठाकूर, सोनल घरत, आरती मढवी, संगिता माळी, पुष्पा घरत, प्रगती घरत आदींनी विशेष मेहनत घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगामी निवडणुका समोर ठेऊन आम आदमी पक्षाची उरण मध्ये सदस्य नोंदणी सुरु