नवी मुंबई पोलीस दलातील २०४ पोलीस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; तब्बल १२ हजार ३७५ उमेदवारांचे अर्ज

पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात  

नवी मुंबई ः पोलीस शिपाई होण्यासाठी बारावी उत्तीर्ण पात्रता असताना नवी मुंबई पोलीस दलातील भरतीत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील असंख्य उच्चशिक्षीत पदवीधरांनी पोलीस शिपाई होण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यात आयुर्वेदिक डॉक्टर, विविध शाखेचे अभियंते, एम.ए., एम.कॉम., बी.एससी, बी.ए., बी.फार्म झालेले असंख्य तरुण-तरुणींचा समावेश असून यात काही पदव्युत्तर शिक्षण घ्ोतलेले उमेदवार देखील पोलीस शिपाई होण्यासाठी मैदानी चाचणी देताना दिसून येत आहेत.  

नवी मुंबई पोलीस दलातील २०४ पोलीस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून, त्यासाठी तब्बल १२ हजार ३७५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात यामध्ये बी.ए.एम.एस., एमडी डॉक्टरसह ४० अभियंते, वकील, एमबीए आदि ५ हजार ६४५ उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. पोलीस शिपाई पदासाठी २४ बी.ए.एम.एस, १०० बीई, २१ बी.टेक, २६३ एम.ए./एम.बी.ए., ७९७ बी.एससी, १ एलएलबी या उच्चशिक्षीत उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आर्म फोर्स ग्रॅज्युएट असलेल्या ५० तरुणांनी देखील सदर भरती प्रक्रियामध्ये सहभाग घ्ोतला आहे. सुरक्षित भविष्याच्या उद्देशाने पोलीस शिपाई पदाच्या भरतीत सहभाग घ्ोतल्याचे भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका उच्चशिक्षीत तरुणाने सांगितले.  
 
सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सरकारी नोकरी मिळणे खूपच अवघड झाले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस शिपाई भरतीसाठी उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. सदर भरती प्रक्रियेत अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. सुरक्षित नोकरी प्राप्त करुन भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली.  
नवी मुंबई पोलीस भरती सहभागी उच्चशिक्षित अर्जदारः
बी.ए.एम.एस. (२४), एम.ई. (०३), बी.ई. (१००), बी.टेक (२१), एम.ए./एम.बी.ए. (२६३), बी.फार्म (०८), बी.कॉम (९९९), एम.कॉम. (११४), एम.एससी. (२८८), एल.एल.बी. (०१), बी.एससी. (७9९७), आर्म फोर्स ग्रॅज्युएट (५०), बी.एड. (०३), बी.पी.एड. (०३), बी.पी.एम.टी. (०१), हॉटेल मॅनेजमेंट (०६), एम.फार्म (०१), एम.ए. (९५), बी.ए. (२८६८), इंटेरियर डिझायनर (०१), एच.एस.सी. (६७७३) आणि अदर बॅचलर्स (८३).

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील मैदानात घ्ोतली जात आहे. या मैदानी चाचणी बंदोबस्तासाठी सुमारे ३०० पोलीस अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मैदानी चाचणी पारदर्शक व्हावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत असून या संपुर्ण भरती प्रक्रियेवर सीसीटिव्हीचा वॉच देखील ठेवण्यात आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

2025 पर्यंत उरण सेझ मध्ये दहा हजार पेक्षा अधिक नोकर भर्ती