धार्मिक स्थळे बचावासाठी जैन धर्मियांचे आंदोलन
तीर्थक्षेत्र पारसनाथ टेकडी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निषेधार्थ जैन समाजाचे आंदाेलन
वाशी ः आमची धार्मिक स्थळे आमच्यासाठी पवित्र आहेत, त्यामुळे जर कोणी त्या ठिकाणी जाऊन धर्माविरुध्द कृत्य केले आणि इतरांना त्रास दिला तर ते आम्हाला मान्य होणार नाही. त्यामुळे सरकारने अशा लोकांना तत्काळ शोधून काढावे आणि आमच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करावे, अशी मागणी विराज सागर महाराज यांनी वाशीत केली.
झारखंड मधील गिरीडीह जिल्ह्यात असलेले जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र पारसनाथ टेकडी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशभरातील जैन समाजात संतापाची लाट पसरली आहे. या निर्णयाला जैन समाजाचा तीव्र विरोध असून नवी मुंबईत देखील पडसाद उमटले आहेत. ८ जानेवारी रोजी जैन धर्मियांकडून या निर्णयाविरोधात आंदोलन करुन तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने जैन धर्मीय उपस्थित होते.