दिबांच्या जयंतीनिमित्त नेरूळ मधील गणपत शेठ तांडेल मैदानात भव्य मेळाव्याचे आयोजन
दिबांच्या जयंती निमित्त होणाऱ्या मेळाव्यासाठी गाव बैठकांवर जोर
नवी मुंबई -: भूमिपुत्रांचे कैवारी आणि साडे बारा टक्के योजनेचे जनक दी बा पाटील यांची १३ जानेवारी. रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त नेरूळ मधील गणपत शेट तांडेल मैदानात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,आणि त्याची रणनीती ठरवण्यासाठी आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून गाव बैठकांवर जोर दिला असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
भूमिपुत्रांनी केलेल्या अतिविराट आंदोलनानंतर नवी मुंबई आंतररष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव देण्याचे शासनाने मान्य केले आहे.मात्र आजही शासन दरबारी भूमिपुत्रांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.त्यामुळे आगामी काळात या मागण्या तडीस नेण्यासाठी भविष्यातील पुढील दिशा ठरवण्यासाठी व भूमिपुत्रांची एकजूट महत्वाची आहे. त्यामुळे या एकजुटीचे दर्शन पुन्हा घडवण्यासाठी दि.बा.पाटील यांच्या जयंतनिमित्त दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी नेरूळ मधील गणपत शेट तांडेल मैदानात भूमीपुत्रांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आणि या मेळाव्याच्या नियोजनासाठीआगरी कोळी युथ फाऊंडेशन च्या माध्यमातून गावा गावात बैठका घेतल्या जात असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबई प्रिमियर लीग मधून मेळाव्यासाठी आवाहन
कोपरखैरणेतील भूमिपुत्र मैदानावर नवी मुंबईतील नावाजलेल्या नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आणि या स्पर्धेदरम्यान १३ जानेवारी रोजी दि.बा.पाटील यांच्या जयंतनिमित्त आयोजित मेलव्यासाठी आवाहन केले जात आहे.