अडसुळ यांना अटक करण्याची कर्मचा-यांची मागणी 

महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची माजी खासदार अडसुळ विरोधात घोषणाबाजी  

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष व दी. महाराष्ट्र मंत्रालय को.ऑ. क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांना माजी खासदार आनंदराव अडसुळ व इतरांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याच्या घटनेचा कोकण भवन मधील राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी शुक्रवारी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी या कर्मचा-यांनी माजी खासदार आनंदराव अडसुळ यांना अटक करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.  

गत 20 डिसेंबर रोजी माजी खासदार आनंदराव अडसुळ हे काही कार्यकर्त्यांसह मंत्रालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या महाराष्ट्र मंत्रालय को.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य को.ऑप. क्रेडीट सोसायटी एम्फ्लाईज युनियनच्या दोन सदस्यांची संस्थेच्या संचालक मंडळावर नेमणूक करण्याची मागणी केली होती. यावेळी दी. महाराष्ट्र मंत्रालय को.ऑ. क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण त्यांना सहा महिने थांबण्याची विनंती केली होती. त्यानंतर आडसूळ यांनी संस्थेच्या कर्मचा-यांकडून प्रत्येक 45 रुपये वर्गणी जमा करुन युनियनच्य नावाने चेक देण्याची मागणी केली. सदरची बाब नियमानुसार नसल्याने पठाण यांनी तसेच करण्यास नकार दिला होता.  

याच गोष्टीचा राग आल्याने आंदराव आडसूळ यांनी पठाण यांच्या अंगावर पाण्याची बॉटल फेकून मारली होती. तर इतरांनी त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर भाऊसाहेव पठाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे. याच गोष्टीच्या निषेधार्थ शुक्रवारी कोकण भवनमधील राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी शुक्रवारी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.  

या वेळी बृहनमुंबई राज्य शासकीय कर्मचारी संघटनेचे कोकण भवन अधक्ष्य लक्ष्मण जाधव, अजीत न्यायनिर्गुणे, कोकण भवन विद्युत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, कौशल्य विकास कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मोगले, संघटक विनोद वैदु हे  प्रमुख पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी या कर्मचा-यांनी जोरदार घोषणाबाजी करत माजी खासदार आनंदराव अडसुळ यांना अटक करण्याची मागणी केली.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बीएमटीसी परिवहन सेवेतील 1587 कामगारांना शासनाने मंजूर केल्याप्रमाणे गाळ्याचे वितरण करण्याची मागणी