अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला रहिवाशांचा चोप

नवी मुंबई: लिफ्ट मध्ये 5 वर्षीय मुलीसोबत लैंगिक व अश्लिल चाळे करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला रहिवाशांनी चोप देऊन त्याला तळोजा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना गत 6 डिसेंबर रोजी रात्री तळोजा फेज-1 भागात घडली. अख्तर हुसेन (19) असे या तरुणाचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याला बलात्कार व पोक्सो कलमाखाली अटक केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अख्तर हुसेन हा तळोजा भागात राहण्यास असून तो एसी रिपेरींगचे काम करतो. गत 6 डिसेंबर रोजी तो तळोजा फेज-1 मधील एका इमारतीत एसीच्या दुरुस्तीसाठी गेला होता. रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास त्याच इमारतीत राहणारी 5 वर्षीय पीडित मुलगी लिफ्ट मधून एकटीच जात असल्याचे पाहून आरोपी अख्तर हुसेन हा देखील तिच्या सोबत लिफ्टमध्ये गेला. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत लिफ्टमध्ये अश्लिल व लैंगिक चाळे करुन एसी दुरुस्ती सुरू असलेल्या घरात पलायन केले.


दरम्यान, पीडित मुलीने लिफ्टमध्ये तिच्यासोबत घडलेल्या प्रकारची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तत्काळ इमारतीतील रहिवाशांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. याची कुणकुण लागल्यानंतर आरोपी अख्तर हुसेन याने रहिवाशांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने त्याला ओळखल्यानंतर रहिवाशांनी त्याला पकडून चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला तळोजा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अख्तर हुसेन याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिबिरामध्ये विद्यालयातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन