क्रेडाई आणि बीएएनएम रायगड प्रॉपर्टी भव्य  प्रदर्शन '' एक्सपो २०२२'' कामोठे-खांदेश्वर येथे सुरू

क्रेडाई-बीएएनएम रायगड प्रॉपर्टी एक्सपो २०२२ प्रदर्शनाचे सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांचे हस्ते उदघाटन 

  नेरुळ:  क्रेडाई आणि बीएएनएम रायगड प्रॉपर्टी भव्य  प्रदर्शन '' एक्सपो २०२२'' कामोठे -खांदेश्वर येथे सुरू झाले असून १२ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे  या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन सिने अभिनेता सुनील शेट्टी यांनी शुक्रवारी केले . या प्रदर्शनात शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. सामान्य नागरिकास परवडणाऱ्या घरापासून अत्याधुनिक लक्झरी फ्लॅट सदर  प्रदर्शनात उपलब्ध आहेत. नवी मुंबईत सर्व  मूलभूत सुविधा उपलब्ध असून ग्राहकांनी या प्रदर्शनात भेट देऊन  आपले स्वप्नातील घर खरेदी करावे असे आवाहन यावेळी सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांनी केले.

             नवी मुंबई -रायगड मधील बांधकाम व्यावसायिकांची  दि क्रीडाई बीएएनएम रायगड बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशन  ही संघटना मागील ५ वर्षांपासून   मेघा प्रॉपर्टी प्रदर्शन भरवते .यंदाचे प्रॉपर्टी प्रदर्शनाचे ६ वे वर्ष आहे . यंदाही ९ ते १२ डिसेंबर २०२२ दरम्यान कामोठे येथे खांदेश्वर   रेल्वे स्टेशन समोर असणाऱ्या  भूखंडावर सिटी ऑफ ड्रीमस हे घोषवाक्य घेऊन  मेघा प्रॉपर्टी प्रदर्शन सुरु आहे. नवी मुंबई, पनवेल ,कर्जत, खोपोली तसेच  सिडकोच्या नयना प्रकल्पात उभ्या असलेल्या आणि सुरू असलेले व भविष्यात निर्माण होणाऱ्या आपल्या प्रकल्पाची माहिती प्रदर्शनात आहे. या सिटी ऑफ ड्रीमस  प्रदर्शनात सुमारे एकोणिस लाख रुपये ते तीन करोड रुपये  किंमत असलेली सर्वसुविधायुक्त फ्लॅट्स  विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आले आहेत. सदर प्रॉपटी प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद  पाहता  शेकडो  बांधकाम व्यावसायिकानी प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे  . या प्रॉपर्टी प्रदर्शनात नेरल, खोपोली ,कर्जत, रोहिंजग, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उलवे, पाम बीच एनआरआय, पाम बीच सानपाडा आदी ठिकाणी आपले महत्वाकांक्षी गृहप्रकल्प निर्माण करत असलेले शेकडो बिल्डर्स मेघा प्रॉपर्टी प्रदर्शनात सहभागी झाले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या स्वप्नातील घर बुक करावे असे क्रेडाईचे अध्यक्ष जितू जगवानी   सेक्रेटरी चिराग शहा  यांनी सांगितले .

           क्रीडाई बीएएनएम रायगड प्रॉपर्टी प्रदर्शनात ग्राहकांना आपल्या स्वप्नातील घर एकाच छताखाली बघून निवडता येणार असून  सुमारे तीन हजार घर विक्रीस ग्राहकांना उपलब्ध आहेत .२०० पेक्षा अधिक गृहप्रकल्प  प्रदर्शनात  आहेत . विविध ५०  नामांकित बिल्डर्स यात सहभागी होणार आहेत .या प्रदर्शनात  स्पॉट   बुकिंग करणाऱ्या  गग्राहकांना  विविध आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहेत  . चार दिवस उपलब्ध असणाऱ्या या  प्रदर्शनात मोठ्या संख्येने ग्राहकांनी  भेट द्यावी  असे  वसंत भद्रा ,

क्रीडाई बीएएनएम, प्रमुख मार्गदर्शक यांनी सांगितले. यावेळी क्रेडाई बीएएनएम अध्यक्ष जितू जगवानी, मार्गदर्शक वसंत भद्रा, ट्रस्टी भद्रेश शाह, सेक्रेटरी चिराग शाह , प्रॉपर्टी प्रदर्शन प्रमुख  मनीष रामजीयानी, विघ्नेशभाई पटेल   समन्वयक प्रमुख, हर्निश कारिया, युवा  समन्वयक आदी बांधकाम व्यावसायिकासह मोठ्या संख्येने घर खरेदीसाठी आलेले ग्राहक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त कृतज्ञता सप्ताहाचे आयाेजन