त्वरित चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई -सिडको अधिकाऱ्यांप्रमाणेच. नवी मुंबई महापालिकेतील काही अधिकारी पूर्ण ठेकेदार म्हणून काम करीत असून. त्याचा परिणाम नागरीसेवा आणि विकासावर होत आहे. यामुळे याची त्वरित चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेता दशरथ भगत यांनी आमदार गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. 

हे अधिकारी  भूमीपुत्र आणि स्थानिक ठेकेदारांची पिळवणूक करून शहराच्या प्रतिष्ठेला काळीमा कसे फासत आहेत, समृद्ध आणि स्वच्छ शहर उध्वस्त कसे करीत आहेत. त्याचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट त्वरीत करून शहराला उल्हासनगर करण्यापासून रोखावे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

या शिवाय ५० लाखांपर्यंतची कामे प्रकल्पग्रस्ताना द्यावीत, त्यांच्यासाठी आरएमसी प्लान्ट सक्तीची अट काढून टाकावी, स्वच्छ सर्वेक्षणाची कामे केल्यानंतर पेमेंटची अडवणूक करू नये अशा तब्बल ४६ मागण्या त्यांनी केल्या आहेत. 

या ठेकेदारांकडे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत आहे, १० लाखांची कामे शासन निर्णयानुसार ॲाफ लाईन काढावीत, उद्यान विभागाची कामे २०२२-२३ च्या दरसूची नुसार काढावीत, स्वच्छता सुपरवायझर पद निर्माण करावे अशा मागण्यांचा यात समावेश आहे

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन, संशोधन करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचे अनुदान