ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी
नवी मुंबई -: नवी मुंबई शहरात सुलभ पार्किंग साठी मनपा मालमत्ता विभागाने शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्किंग सुरू केले असून त्याचे ठेके दीले आहेत. मात्र यातील काही ठेकेदार मनपाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा दुपटीने शुल्क वसूल करून लुटमार करीत असल्याचा प्रकार सुरू आहे.त्यामुळे अशा ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई शहरात वाहन पार्किंग समस्या जटील होत चालली आहे.आणि या वाहन पार्किंग वर तोडगा काढण्यासाठी मनपा मालमत्ता विभागाने अटी शर्ती च्या अधीन राहून ठेके दीले आहेत.आणि यात पार्किंग ठिकाणीं दर्शनी भागात दर सूची लावणे,मनपाने निर्धारित केलेल्या दरांपेक्षा अधिक शुल्क न आका या मुख्य अटिंसह इतर अटींचा समावेश असतो.मात्र बेलापूर येथील पे अँड पार्किंग ठेकेदाराने या मुख्य अटींनाच हरताळ फासत ज्यादा शुल्क वसुली करत वाहन चालकांची लुटमार सुरू ठेवली आहे.बेलापुर कोकण रेल्वे इमारतीच्या शेजारी, रायगड भवन कडे जाणाऱ्या रस्त्यावर मनपा मालमत्ता विभागाने १ सप्टेंबर २०२२ पासून पे अँड पार्किंग चा ठेका दिला आहे.मात्र.सदर. ठेकेदाराने या ठिकाणी मनपाने निर्धारित केलेली दर सूची लावली नाही.तसेच येथील कर्मचारी मागणी करून देखील पावतीवर वाहनाचा पूर्ण नंबर टाकत नाहीत.तसेच मनपाने जे दर निश्चित केले आहेत त्याच्या दुप्पट शुल्क वसूल करून एक प्रकारे वाहन चालकांची लुटमार सुरू ठेवली आहे.त्यामुळे सदर
ठेकेदारावर कारवाई कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्याची मागणी वाहन चालकांकडून आता जोर धरू लागली आहे.
वादग्रस्त ठेकेदाराला 'दादांचा 'आशीर्वाद?
वाशी सेक्टर १६ येथील नाल्यावरील पे अँड पार्किंग मध्ये वरून ठेकेदाराकडून नवीन नोंदणी न केलेली वाहने पार्क करून व्यवसायिक वापर सुरू ठेवला आहे आणि याबाबत मनपा मालमत्ता विभागाच्या पाहणीत सत्यता आढळून आल्यानंतर सदर ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.मात्र सदर नोटीसिला केराची टोपली दाखवत या ठिकाणी परिस्थिती जैसे थे वैसेच ठेवली होती.आता बेलापूर मध्ये ही याच वादग्रस्त ठेकेदारामार्फत अटी शर्थीचे भंग करून मनपाने निश्चित केलेल्या निर्धारित दरांपेक्षा दुप्पट दर आकरण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यामुळे असे धाडस करण्यामागे या ठेकेदारास मालमत्ता विभागातील कुठल्या दादांचा आशीर्वाद आहे का ?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.