कचरा संकलन करणा-या स्वच्छताकर्मींच्या आकर्षक जॅकेट्सव्दारे ओलू - सुकू कचरा वर्गीकरणाचा प्रसार  

७२० वाहन चालक-स्वच्छताकर्मींना पल्युरोसंट रंगाचे जॅकेटस्‌

नवी मुंबई ः दैनंदिन शहर स्वच्छतेमध्ये कचरा संकलित करणाऱ्या कामगारांचाही मोठा वाटा आहे. घराघरातच कचऱ्याचे ओला, सुका अशाप्रकारे वर्गीकरण करण्यावर भर देण्याप्रमाणेच वर्गीकृत कचरा वेगवेगळ्या कचरा गाड्यांमध्ये अथवा कचरा गाड्यांमधील स्वतंत्र कप्प्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जात आहे.

प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी म्हणजे घरातच वेगवेगळा ठेवणे आणि तो कचरा गाड्यांमध्ये देतानाही वेगवेगळा देणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने प्रचार-प्रसार व्हावा याकरिता ओल्या कचऱ्यासाठी ओलू आणि सुक्या कचऱ्यासाठी सुकू असे अनुक्रमे हिरव्या आणि निळ्या रंगातील कचरा डबे कार्टुन स्वरुपात महापालिकेच्या वतीने प्रसिध्द करण्यात आले आहेत.


या ओलू आणि सुकू डब्यांच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जात असून कचरा संकलित करणाऱ्या  कचरा गाड्यांवरील ७२०वाहन चालक आणि स्वच्छताकर्मींना पल्युरोसंट रंगाचे जॅकेटस्‌ देण्यात आले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे उपस्थित होते.
सदर जॅकेटवर पुढील बाजुस नवी मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह तसेच स्वच्छता के दो रंग क्ष् हरागिलासुखानिला असे ‘स्वच्छ भारत मिशन'चे केंद्र सरकार मार्फत जाहीर ‘अभियान'चे बोधचिन्ह प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जॅकेटच्या समोरील खालील बाजुस ओलू आणि सुकू या कार्टुन्सची चित्रे प्रसिध्द करुन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा. सदर ठेवण्याच्या डब्याचे रंग हिरवा आणि निळा आहे अशाप्रकारे जनजागृती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जॅकेटच्या मागील बाजूस आगामी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'चे बोधचिन्ह आणि सर्वेक्षणाला सामोरे जाताना महापालिकेने नजरेसमोर ठेवलेले ‘निश्चय केला नंबर पहिला' असे ध्येय वाक्य आणि ‘इंडिया व्हर्सेस गार्बेज' या केंद्र सरकार मार्फत जाहीर अभियानाचे बोधचिन्ह प्रदर्शित करण्यात आले आहे.

दरम्यान, सदर जॅकेटस्‌च्या माध्यमातून कचरा वर्गीकरणाचा संदेश नागरिकांपर्यंत दररोज नागरिकांपर्यंत कचरा संकलनासाठी पोहचणाऱ्या स्वच्छताकर्मींमार्फत प्रसारित केला जात आहे. या पल्युरोसंट रंगाच्या जॅकेटस्‌ मुळे कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छताकर्मींना स्वतंत्र ओळख देखील प्राप्त झालेली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ घेण्याकरिता फेरीवाले व तत्सम पथ विक्रेत्यांना आवाहन