ओवे धरणानजिक स्टोन क्रशर्सची धडधड; वारंवार स्फोट

ओवे धरणानजिक वारंवार स्फोट

नवी मुंबई ः खारघर टेकडी ओवे धरण परिसरातल्या स्टोन क्रशर्स आणि ववॉरींमध्ये वेळोवेळी होणाऱ्या स्फोटांच्या आवाजाबद्दल पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली असून शासनाला अवैध खोदकामावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात ‘नॅेटकनेवट फाऊंडेशन'ने केलेल्या तक्रारीची दखल घेत ‘रायगड'चे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. ‘पनवेल'चे तहसीलदार विजय तळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सदरचे क्षेत्र वन
विभागाच्या अंतर्गत येत असल्याचा अहवाल आधीच प्रस्तुत केला आहे. सदर ठिकाणी काही खडक फोडून काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्याचे बांधकाम केल्याचे आढळले असल्याचे विजय तळेकर यांनी सांगितले.

खारघर टेकडी परिसरात स्टोन क्रशर्स असल्याचे म्हटले आहे. परंतु, चालकांकडे ‘सिडको'कडून मिळालेले नो-रॉयल्ट प्रमाणपत्र असल्याचे सांगितले
आहे. येऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील गावांमधील खडकांचे क्रशिंग करण्यासाठी क्रशर यंत्रांचा वापर केला जातो, असे तहसीलदार तळेकरांनी सांगितले.
दरम्यान, तहसीलदार विजय तळेकर यांनी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'च्या तक्रारीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

विमानतळ प्रकल्प क्षेत्रापासून कितीतरी मैल दूर, वनांच्या परिसरात क्रशर्सची कामे सुरु आहेत. विमानतळ प्रकल्पस्थळी क्रशर असायला हवे होते. सदर सर्व प्रकार संशयास्पद आहे. त्यामुळे आम्ही शासनाला पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. -बी.एन.वुÀमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

आमच्या वन विभागाच्या फील्ड टीमला तक्रारींची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. एका वन अधिकाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे सदर क्षेत्रावर खाजगी मालकी असून कुटचा रस्त्याचे काम थांबवले गेले आहे. वन विभागाला ओवे धरणानजिक स्टोन कशर्सच्या कार्यामागचे कारण अजुनही माहित पडलेले नाही. -एस.एन.वाघमोडे, सहाय्यक संरक्षक, वन विभाग.

खारघर गुरुद्वारा येथील मागचा भाग आणि ओवे धरण परिसरातून विविध खोदकामांमुळे होणारे स्फोट आम्ही ऐकत असतो. पहाटेच्या सुमारास अशाप्रकारचे कर्कश आवाज ऐकू येतात. -ज्योती नाडकर्णी, पर्यावरण कार्यकर्त्या, खारघर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरणच्या पीरवाडी समुद्र किनाऱ्यावर अवतरल्या दुर्मिळ पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती