विद्युत रोहित्र खोलीचा  गोडाऊन आणि रहिवासी वापर

वाशी सेक्टर १९ पामबीच मार्गावरील  महावितरणच्या रोहित्र खोलीची सुरक्षा वाऱ्यावर

नवी मुंबई : वाशी सेक्टर १९ पामबीच मार्गावरील  महावितरणच्या रोहित्र खोलीची सुरक्षा वाऱ्यावर  सोडली आहे.या खोलीचा गोडाऊन सह रहिवाशी वापर होत आहे.त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताचा धोका बळावला असून कुणाच्या जीवावर बेतू शकते ?

नवी मुंबई शहरात महावितरण कडून आपल्या मालमत्तांची सुरक्षा अबाधित राखली जात नाही.त्यामुळे महावितरणच्या रोहित्र खोल्यांचा राजरोस पणे गैरवापर होताना दिसत आहे.शहरारीतील बहुतेक रोहित्र खोल्यांचा वापर गर्दुल्ले अमली पदार्थ सेवना करण्यासाठी करत अस उघड झाले आहे.तर आता काही रोहित्र खोल्यांचा वापर  गोडाऊन म्हणुन केला जात असून त्याचा रहिवास वापर देखील सुरू केला आहे. वाशी सेक्टर १९ पामबीच मार्गावरील  महावितरणच्या रोहित्र खोलीची देखील हीच अवस्था आहे.मात्र या खोलीत असलेल्या उच्च दाबाच्या रोहित्र मुळे आग लागली तर कुणाच्या जीवावर बेतू शकते.त्यामुळे महावितरण ने सदर रोहित्र  खोली बंदिस्त करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘नवी मुंबई मर्चंट जिमखाना'मध्ये ‘टर्फ कोर्ट'ची उभारणी