‘नवी मुंबई मर्चंट जिमखाना'मध्ये ‘टर्फ कोर्ट'ची उभारणी

६५०० चौरस फुट जागेत क्रिकेट, फुटबॉल खेळाची सुविधा उपलब्ध

नवी मुंबई : नवी मुंबई मर्चंट जिमखाना ‘एनएमएमजी'ने येथे ६५०० चौरस फुट आकाराचे टर्फ कोर्ट बनविण्यात आले आहे. या  सुविधेमुळे क्रिकेट आणि फुटबॉलसाठी सर्वाधिक मागणी असलेली नवीन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर टर्फ नवी मुंबईतील सर्व नागरिकांसाठी खुले असेल, तर क्लबच्या सदस्यांना खेळण्याच्या फीमध्ये सदस्यांची सवलत देण्यात येणार आहे.

या ‘टर्फ कोर्ट'चे उद्‌घाटन माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. ‘टर्फ कल्ब'च्या उद्‌घाटनाप्रसंगी ‘नवी मुंबई मर्चंट जिमखाना'चे अध्यक्ष मोहन गुरनानी, समिती सदस्य मोहम्मद सिराज बशीर, धर्मराज महाले, जयश्री वेद, मोहन अडिगे तसेच टर्फ कोर्ट चालवणारे सम्राट ठक्कर, आदि उपस्थित होते.

 ‘‘नवी मुंबई मर्चंट जिमखाना' नवी मुंबईतील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. वाशी आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या तरुणांना तसेच प्रौढांनी त्यांचा मौल्यवान वेळ सोशल मिडीयावर घालवण्याऐवजी त्यांना मनोरंजनासाठी सांघिक आणि शारीरिक क्रियाकलाप म्हणून ‘टर्फ कोर्ट'वर क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याची संधी मिळेल, असे मोहन गुरनानी म्हणाले.

‘नवी मुंबई मर्चंट जिमखाना'च्या नुतनीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. ‘नवी मुंबई मर्चंट जिमखाना' नवी मुंबईतील वातावरण, सेवा, सुविधा आणि उपक्रमांच्या बाबतीत सर्वोत्तम बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तळमजल्यावरील दोन्ही बँक्वेट हॉल तसेच पहिल्या मजल्यावर मोठा बँक्वेट हॉल पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आला असून तो कार्यक्रमांसाठी खुला करण्यात आला आहे,  अशी माहिती गुरनानी यांनी दिली.

दरम्यान, आम्ही तरुणांना क्रिकेट आणि फुटबॉलचे प्राथमिक व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करु. जेणेकरुन तरुणांना त्यांच्या आवडीच्या खेळात करिअर निवडता येईल, असे ‘नवी मुंबई मर्चंट जिमखाना'चे सचिव राजेश प्रजापती म्हणाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणविषयक लघुचित्रपट महोत्सवास मिळाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद