पार्किंग नियोजनासाठी महापालिकेची ठोस पावले

सीबीडी, वाशी येथील पार्किंगचे भूखंड पीपीपी तत्वावर विकसीत करणार

नवी मुंबई : नवी मुंबई शहराला भेडसावणाऱ्या पार्किंग समस्येची सोडवणूक करण्याकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने विशेष लख दिले जात असून या विषयी वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने विभागवार मायक्रोप्लॅनिंग केले जात आहे.

यामध्ये वाहतूक नियोजना सोबतच सिडको कडून पार्किंग प्लॉट उपलब्ध करुन घेणे. तसेच मिळालेले प्लॉट पार्किंगच्या दृष्टींने विकसीत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सीबीडी, सेक्टर-१५ ए येथे पार्किंग करिता बहुमजली इमारत बांधण्यात आली असून येथील क्षमता १२१ दुचाकी आणि ३९६ चार चाकी गाड्या इतकी आहे. सदर संपूर्ण परिसर विविध कार्यालये आणि वाणिज्य संस्था यांनी गजबजलेला असल्याने या पार्किंग इमारतीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहने पार्किंगसाठी फायदा होणार आहे. अशाच प्रकारे आणखी एक ६९०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड सेक्टर-१५, सीबीडी येथे तसेच ११ हजार चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड सेक्टर-३०, वाशी येथे उपलब्ध झाला आहे. या दोन्ही भूखंडावर पार्किंग व्यवस्था नवी मुंबई महापालिका मार्फत पीपीपी तत्वावर (सार्वजनिक खाजगी भागिदारी) विकसीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशा कामांमध्ये मोठया प्रमाणावर भांडवली खर्च होत असतो. यादृष्टीने या दोन्ही भूखंडावरील पार्किंग व्यवस्था पीपीपी तत्वावर विकसीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गतीमान कार्यवाही केली जात आहे. याबाबत आयुक्तांमार्फत वारंवार आढावा बैठकांचे आयोजन केले जात असून या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यावर भर दिला जात आहे.

सदर दोन्ही भूखंडावरील पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनाबाबत आर्थिक व्यवहार सलागार यांची नेमणूक करण्यासाठी महापालिकेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीला मान्यताप्राप्त संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याद्वारे नेमणूक होणाऱ्या सल्लागारांच्या रिपोर्ट नुसार पीपीपी तत्वावर पार्किंगचे नियोजन करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पार्किंग व्यवस्था अद्ययावत असावी याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या पार्किंग व्यवस्थेचा लाफ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यादृष्टीने महापालिकेच्या निधीचीही बचत व्हावी याकरिता पीपीपी तत्वाचा वापर करुन वाहनतळ विकसीत केले जात आहे. इतर शहरातील पर्यटक वाहन चालकांनाही कोणते पार्किंग लॉट उपलब्ध आहेत, याची माहिती सहजपणे उपलब्ध होण्याकरिता स्वतंत्र ॲप विकसीत केले जात आहे. नागरिकांनी आपले वाहन  पार्किंगच्या योग्य जागीच उभे करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका मुख्यालयात कचरा फेकण्याचा इशारा