शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
करावे गावात ३५ सीसीटिव्ही कॅमेरे
नागरिकांच्या सुरक्षासाठी माजी नगरसेवकाने बसवला ‘तिसरा डोळा'
वाशी : करावे प्रभागातील वाढत्या चोऱ्यांना आळा बसावा तसेच नागरिकांना सुरक्षा लाभावी, याकरिता माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी करावे गावात स्वखर्चाने ३५ सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत.
नवी मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्या सोबतच नवी मुंबई शहरात घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. चोरटे मंदिरांना देखील लक्ष करीत आहेत. करावे गावातील नागरिक देखील चोऱ्यांमुळे हैराण झाले आहेत. अलिकडेच करावे गावातील विठ्ठल मंदिर आणि गावदेवी मंदिर मध्ये चोरीची घटना घडली होती. त्यामुळे करावे गावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याचीच दखल माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी प्रशासनाची वाट न बघता नागरिकांच्या सुरक्षेत्सव स्वखर्चाने करावे गावात ३५ सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. करावे गावातील चौक, मंदिरे तसेच मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर या तिसऱ्या डोळ्यांची नजर असणार आहे. विनोद म्हात्रे यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल करावे गावात त्यांचे कौतुक होत आहे.