दिव्यांग मुलांच्या पालकांकरिता जेनेटिक डिसॉर्डर बाबत मार्गदर्शन

ईटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्रामध्ये दुर्मिळ जनुकीय दिव्यांगत्व संबंधी कार्यशाळा संपन्न


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण-सेवा सुविधा केंद्राद्वारे दिव्यांगांच्या कल्याणार्थ सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. तसेच दिव्यांगत्व प्रतिबंधाकरिता विविध उपक्रम राबवले जात असतात. या अनुषंगाने इटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांच्या पालकांकरिता जेनेटिक डिसॉर्डर संबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पालकांना दुर्मिळ जनुकीय दिव्यांगत्व (रेअरजेनेटिक डिसॉर्डर) संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी जेनेटिक रिसर्च सेंटर (घ्ण्श्R-ऱ्घ्RRण्प्) येथील सायंटिस्ट डी विभागाचे प्रमुख असणारे डॉ. शैलेशपांडे, सिनिअर टेक्निकल ऑफिसर नेहा मिंदे आणि सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट तन्वी अगरबत्तीवाला उपस्थित होते.

यावेळी डॉ. शैलेश पांडे यांनी सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या पध्दतीने जेनेटिक रिसर्च सेंटरच्या कामाची माहिती दिली. तसेच विविध जेनेटिक व्यंग होण्याची कारणे तसेच कोणत्या उपाययोजनांद्वारे याला प्रतिबंध करता येईल, या विषयी माहिती दिली. यावेळी डॉ. शैलेश पांडे आणि नेहा मिंदे यांनी पालकांच्या शंकांचे निरसन करीत त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी ज्या पालकानी दिव्यांग मुलांचे ख्ीीब्दूब्ज्ग्हु, इघ्एप्, श्ग्म्ीदीीीीब् अशा टेस्टचे रिपोर्टस्‌ प्रत्यक्ष आणले होते, ते पाहून वैयक्तिक मार्गदर्शनही केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा!