वाहतूक कोंडीमुक्त शाळा उपक्रमामुळे शाळांसमोरील वाहतूक काेंडी कमी

 वाहतूक पोलिसांच्या उपक्रमाचे घणसोली, कोपरखैरणे भागातील शाळांकडून स्वागत

नवी मुंबई : कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या वाहतूक कोंडीमुक्त शाळा या उपक्रमामुळे कोपरखैरणे आणि घणसोली भागातातील बहुतेक शाळांजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. त्यामुळे शाळेतील मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा वेळ वाचत आहे. कोपरखैरणे वाहतूक पोलिसांच्या सदर कोंडी मुक्त शाळा उपक्रमाचे कोपखैरणे आणि घणसोलीतील शाळांकडून स्वागत होत आहे. यातील रिलायन्स फाऊंडेशन स्कुलसह इतर शाळांनी तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांना पत्र लिहून या उपक्रमाचे कौतुक केले आहे.  

कोपरखैरणे वाहतूक विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनतेमध्ये विविध प्रकारे प्रबोधन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वतः आणि त्यांच्या पालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, याबाबत आवाहन करण्यात आले. याशिवाय वाहतुकीच्या नियमांचे प्रबोधनपर घोषवाक्याचे पोस्टर्स, बॅनर्स तयार करुन ते वर्दळीच्या भागात तसेच चौका-चौकात लावण्यात आले. कोपरखैरणे-घणसोली रेल्वे स्थानकाजवळील वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्य आयोजित करुन लोकांना वाहतुकीचे नियम न पाळल्याने काय परिणाम होऊ शकतात? याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे वाहतुकीचे सर्व नियम पाळणाऱ्या नागरिकांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला.  

वाहतूक पोलिसांनी कोपरखैरणे-घणसोली भागातील सिग्नलवर उभे राहून नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास देखील भाग पाडले. वाहतूक पोलिसांच्या सदर प्रबोधनपर उपक्रमांना नागरिकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना वाहतुकीचे नियम आपल्या भल्यासाठी असल्याचे लक्षात आल्याने अनेक लोकांना स्वंयशिस्तीने स्वतःहुन वाहतुकीचे नियम पाळण्यास सुरुवात केली आहे. तर नियम न पाळणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर होणाऱ्या पोलीस कारवाईची तसेच वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येणारे विविध प्रकारच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि उपक्रम यामुळे पोलिसांचे आभार मानून त्यांचे अभिनंदन सुध्दा करण्यात येत आहे.  

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या सदर उपक्रमामुळे कोपरखैरणे आणि घणसोली भागातातील बहुतेक शाळांजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. त्यामुळे शाळेतील मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा वेळ वाचत आहे. कोपरखैरणे वाहतूक पोलिसांच्या या कोंडी मुक्त शाळा उपक्रमाचे स्वतः कोपखैरणे आणि घणसोलीतील शाळांकडून स्वागत होत आहे. यातील रिलायन्स फाऊंडेशन स्कुलने तसेच इतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांना पत्र लिहून सदर उपक्रमाचे कौतुक केले आहे.  

कोपरखैरणे वाहतूक शाखेने ऑगस्ट महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २०५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन आत्तापर्यंत एकूण १४ लाख १२ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने रोडच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणे, हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल तोडणे, सीट बेल्ट न लावणे तसेच इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून अशाच प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम, उपक्रम भविष्यात देखील राबविण्याबरोबरच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. - विश्वास भिंगारदिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी कोपरखेरणे वाहतूक शाखा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिव्यांग मुलांच्या पालकांकरिता जेनेटिक डिसॉर्डर बाबत मार्गदर्शन