नवी मुंबई मधील गणेशोत्सव मंडळांना दिलासा

पर्यावरणाचे भान ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा -आयुक्त राजेश नार्वेकर

नवी मुंबई : यावर्षी १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा केला जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकरिता आकारले जाणारे मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जाहीर केले आहे.

पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर निर्णय जाहीर करण्यात आला असून अशाच प्रकारची मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, विविध लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्याकडूनही करण्यात आली होती. त्यास अनुसरुन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला आहे.

उच्च न्यायालयाने संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेने मंडप उभारण्याची परवानगी देण्याची ‘ई-सेवा संगणक प्रणाली' सुरु केली असून १९ ऑगस्ट पासून मंडळी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सर्व गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवाना प्राप्त करुन घ्यावयाची असून त्याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तथापि परवानगी घेणे आवश्यक आहे, याची नोंद घेण्यात यावी.

१९ ऑगस्ट पासून या ऑनलाईन परवानगी प्रक्रियेला सुरुवात झाली असून गणेशोत्सवाच्या दहा दिवस अगोदर पर्यंतच ऑनलाईन परवानगी प्रणाली सुरु राहील, याची मंडळांनी नोंद घ्यावयाची आहे. मंडप उभारणी परवानगीकरिता अर्ज महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे ैैै.ीूेहस्स्म्दहत्ग्हा.म्दस् या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. या सुविधेचा लाभ घेऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी अतिशय उत्साहात पर्यावरणाचे भान ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे येथे ‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम'चे १६ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न