जुईनगर रेल्वे स्टेशनवर आज - उद्या विशेष ट्रफीक ब्लॉक
पनवेल आणि वाशी प्लॅटफॉर्मवर उपनगरी गाड्यांच्या रेकची दैनंदिन गर्दी कमी होण्यास मदत
नवी मुंबई : जुईनगर स्थानकात डाऊन आणि अप हार्बर मार्गावर तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावर २७ ऑगस्ट दरम्यान जुईनगर स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसह ४ नवीन उपनगरी गाड्यांसाठी (EMU) स्टॅबलिंग साईडींग सुरु करण्यासाठी विशेष ट्रॅफीक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
जुईनगर स्थानकावर उपनगरी गाड्यांसाठी(EMU) ४ नवीन साईडींग बांधण्याची योजना आहे. या ४ नवीन उपनगरी गाड्यांसाठीच्या साईडींग्जच्या बांधकामामुळे पनवेल आणि वाशी प्लॅटफॉर्मवर उपनगरी गाड्यांच्या रेकची दैनंदिन गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे सानपाडा कारशेडच्या स्टॅबलिंग लाईन्सवरील गर्दीही कमी होईल. जुईनगर येथील सदर नवीन स्टेबलिंग लाईन्सवर उपनगरी गाड्यांच्या रेकची तपासणी सुलभ करेल.यासंदर्भातील प्रसिध्दी पत्रक ‘मध्य रेल्वे'च्या जनसंपर्क विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
स्टेबलिंग लाईन्सच्या बांधकामासाठी हाती घेतलेल्या ब्लॉकचा तपशीलः
जुईनगर स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसह स्टेबलिंग साईडींग सुरु करण्यासाठी विशेष ट्रॅफीक ब्लॉक
ब्लॉकचा विभागः
सानपाडा कारशेडच्या जुईनगरच्या टोकाकडे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर (बे लाईन १ आणि २). ब्लॉकची तारीख, वेळ, कालावधीः
२६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते २७ ऑगस्ट २०२३ (रविवार) रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत (फक्त दिवसाच्या वेळेत ब्लॉक).
ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन/ओरीजनेशनः
२६ ऑगस्ट (शनिवार रात्रीची वेळ),२६ आणि २७ ऑगस्ट (शनिवार-रविवार रात्रीची वेळ) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २० वाजता आणि २२.५० वाजता सुटणाऱ्या पनवेल लोकल तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २१.३८ वाजता आणि २१.५८ वाजता सुटणाऱ्या बेलापूर लोकल वाशी येथे संपुष्टात (Short Terminate) येतील.
२६ ऑगस्ट रोजी (शुक्रवार-शनिवार रात्रकालीन) वाशी येथून बेलापूर-सीबीडी येथून ०५.५० वाजताची बेलापूर-वडाळा रोड लोकल आणि बेलापूर-सीबीडी येथून ०७.०४ वाजताची बेलापूर-छत्रपती शिवाजी महाराज लोकल (Short Originating) गाड्या सुटतील.
ब्लॉकमुळे होणारे परिणामः
सानपाडा कारशेडच्या जुईनगरच्या टोकापासून /पर्यंत प्रवेश आणि निर्गमन उपलब्ध होणार नाही. रविवारच्या ब्लॉक दरम्यान हार्बर आणि ट्रान्स-हार्बर सेवा देखील उपलब्ध होणार नाहीत.