उरण नगर परिषदेकडून गांधी चौक परिसरातील रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार

उरण नगर परिषद कडून शहरात स्वच्छता अभियान

उरण : उरण नगर परिषद कडून शहरात शुक्रवारी ( दि२५) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगले यांनी स्वतः गांधी चौक परिसरातील रस्त्यांवर अडगळीच्या ठिकाणी रहिवाशांनी, व्यापाऱ्यांनी टाकलेले सामान,केर कचरा हा आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोळा करून बंद अवस्थेतील पार्किंग करुन ठेवलेली वाहणे टोचन लाहून हलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

    उरण नगर परिषदेकडून दर दिवशी शहरातील गोळा होणारा केर कचरा उचलण्याचे काम हे केले जाते.मात्र शहरातील रहिवाशी आणि व्यापारी वर्ग हे रस्त्यावर, अडगळीच्या ठिकाणी जाणूनबुजून पडिक सामान,टाकावू केर कचरा हा टाकण्याचे काम करत आहेत.तसेच बंद अवस्थेत पडून राहिलेली वाहने गांधी चौक सारख्या गजबजलेल्या वस्तीत पार्किंग करुन ठेवण्याचे काम करत आहेत.त्यामुळे पादचारी,वाहन चालक, विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिक यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.

   यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी उरण नगर परिषदेकडून शुक्रवारी ( दि२५) गांधी चौक परिसरातील रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.यावेळी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगले यांनी स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रस्त्याच्या अडगळीच्या ठिकाणी पडून राहिलेला केर कचरा गोळा करून बंद अवस्थेतील पार्किंग करुन ठेवलेली वाहणे टोचन लाहून हलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.उरण नगर परिषदेच्या या उपक्रमाबद्दल जेष्ठ नागरिकांनी, बाहेर गावाहून बाजारात, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

    उरण नगर परिषदेकडून गांधी चौक या गजबजलेल्या वस्तीत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.तसेच बंद अवस्थेतील पार्किंग करुन ठेवलेली वाहणानाच्या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.ज्या मालकांनी आपली वाहणे रस्त्यावरुन हलवलेली नाहीत ती वाहणे टोचन लाहून हलविण्यात येत आहेत.सदर मोहीम ही सर्व शहरात राबविण्यात येणार आहे.तरी ही आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरवासियांनी प्रथमतः पुढाकार घेणे गरजेचे आहे - राहुल इंगले - मुख्याधिकारी उरण नगर परिषद 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको घरांच्या किंमती होणार कमी