बंद मागे घेण्याची घोषणा उशिरा

एपीएमसी बाजारात फक्त ३० गाड्या दाखल

वाशी : नाशिक मधील कांदा व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारातील व्यापाऱ्यांनी २३ ऑगस्ट रोजी बंद पुकारला होता. मात्र, सदर बंद मागे घेण्यात आल्यानंतर त्याबाबत घोषणा २३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आली. त्यामुळे सदर बंद मागे घेण्याची माहिती शेतकऱ्यांना उशिरा भेटल्याने एपीएमसी बाजारात कांद्याची आवक पुरती रोडावून अवघ्या ३० गाड्या कांदा आवक झाली. मात्र, याचा दरांवर कुठलाही परिमाण जाणवला नसून, २४ ऑगस्ट रोजी  एपीएमसी बाजारात कांदा दर स्थिर होते.

निर्यात शुल्क विरोधात नाशिक मधील व्यापाऱ्यांनी पुकारला होता.या बंदला पाठिंबा देण्यासाठी एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी २३ ऑगस्ट रोजी एक दिवसीय बंद पुकारला होता. केंद्र सरकार कांदा खरेदी करणार असल्याने नाशिक येथील बाजार समिती २३ ऑगस्ट रोजी सुरु होणार होती. त्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची कोणतीही असुविधा होऊ नये म्हणून २३ ऑगस्ट रोजी पुकारलेला बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, सदर निर्णय घेण्यास २३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजले. तर २३ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याची घोषणा २१ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यामुळे बंद मागे घेण्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहचू शकली नाही. २४ ऑगस्ट रोजी बंद समजून शेतमाल भरला गेला नाही. परिणामी एपीएमसी बाजार आवारात कांद्याची आवक रोडावली आणि अवघ्या ३० गाड्या कांदा आवक झाली. मात्र, आवक कमी होऊन देखील त्याचा दरांवर कुठलाच परिणाम जाणवला नसून, कांद्याचे दर २२ ते २५ रुपये प्रतीकिलो स्थिर होते, अशी माहिती एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.

 वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार आवारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून रोज बटाट्याची ५० ते ६०  गाड्या आवक होत असते. मात्र, २४ ऑगस्ट रोजी एपीएमसी बाजारात अवघ्या २७ गाड्या आवक झाली आहे. येणारा बटाटा पावसात भिजत असल्याने आणि त्याची साठवण होत नसून खराब होत आहे. त्यामुळे या बटाट्याला उठाव नसल्याने दरात २ रुपयांनी घसरण  झाली आहे. २४ ऑगस्ट रोजी एपीएमसी घाऊक बाजारात बटाटा १० ते १५ रुपये प्रतिकिलो विकला गेला, अशी माहिती एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 तुर्भे गावातील रस्ते खड्डेमय!