शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून वाशी खाडीपुलाची पाहणी
नवीन पुलांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना - ना. दादाजी भुसे
नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी वाशी येथील ठाणे खाडीपुलाच्या कामाची पाहणी करत सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. दरम्यान, कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात ना. भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
याप्रसंगी ‘एमएमआरडीए'चे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, डी. एम. मोरे, नितीन बोराळे, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्यासह पुलाचे काम करणाऱ्या एल ॲन्ड टी कंपनीचे अधिकारी तसेच ‘एमएसआरडीसी'चे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-पुणे महामार्गावरील खाडीवरील जुना पुल १९७१ मध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर दुसरा पुल सन १९९५ मध्ये बांधण्यात आला. आता आणखी दोन पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. एक पुल मे २०२४ मध्ये तर दुसरा पुल सप्टेंबर २०२४ मध्ये वाहतुकीसाठी तयार होतील. सध्या ठाणे खाडी पुलावर सहा लेनचा रस्ता आहे. या ठिकाणी आणखी या दोन पुलांचे काम सुरु आहे. या दोन्ही पुलांची कामे पूर्ण झाल्यावर सदरचा रस्ता बारा लेनचा होणार आहे. या माध्यमातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे ना. दादाजी भुसे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, ठाण्यातील साकेत पुलावरील नादुरुस्ती संदर्भात संबंधित विभागाला कळविण्यात आले असून त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल, असेही ना. भुसे यांनी सांगितले.