स्लॅब एकावर एक कोसळून दोघांचा मृत्यू

नेरुळ मधील जिमी पार्क इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती

नवी मुंबई : नेरुळ, सेक्टर -१७ मधील जिमी पार्क इमारतीच्या ए विंग मधील सहाव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सदर इमारतीतील पाच मजल्यांचे स्लॅब एकावर एक कोसळल्याच्या दुर्घटनेत ताजी असतानाच आता नेरुळ विभागातील सारसोळे येथील तुलसी भवन या तीन मजली इमारतीतील एका विगंच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब एकावर एक कोसळल्याची दुर्घटना २३ ऑगस्ट रोजी घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील नवी मुंबईत स्लॅब कोसळल्याची घटना घडलेल्या आहेत. सदर घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबईतील जुन्या इमारतींच्या स्ट्रवचरल ऑडीटचा मुद्दा चर्चेत आला आहे.

नेरुळ, सेवटर-६ सारसोळे गांव येथील भूखंड क्रमांक-३१३ वरील तुलसी भवन या इमारतीच्या सी विंग मध्ये सदर दुर्घटना घडली. तुलसी भवन इमारतीतील सी वींग मधील तिसऱ्या मजल्यावर लादी लावण्याचे काम सुरु होते. २३ ऑगस्ट रोजी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून दुसऱ्या मजल्यावर, तर दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळले. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दल आणि स्थानिक नेरुळ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बचाव पथकांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले. 

या दुर्घटनेत यात एका  पुरुष व एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन जण जखमी झाले. मयतांमध्ये महिला रहिवाशी असून पुरुष कामगार असल्याची माहिती आहे. तर जखमींना तातडीने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महापालिका आयुवत आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुवत डॉ. बाबासाहेब राजळे, आदि अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या वतीने या इमारतीतील रहिवाशांना समाज मंदिरात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

जुन्या इमारतींच्या स्ट्रवचरल ऑडीटचा मुद्दा चर्चेत...
नेरुळ, सेक्टर -१७ मधील जिमी पार्क इमारतीच्या ए विंग मधील सहाव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सदर इमारतीतील पाच मजल्यांचे स्लॅब एकावर एक कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबून पडलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची घटना ११ जून २०२२ रोजी दुपारी घडली. तुलसी भवन इमारत दुर्घटनेनंतर जिम्मी पार्क इमारत दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.

११ जून २०२२ रोजी जिमी पार्क इमारतीत ए विंग मधील सहाव्या मजल्यावरील पलॅटमध्ये पलोरींगचे काम सुरु होते. त्यावेळी सदर पलॅटच्या हॉलमध्ये व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने पलोरिंगचे काम सुरु असताना सहाव्या मजल्यावरील पलोरिंगसह पाचव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. सदर स्लॅबच्या वजनामुळे पाचवा, चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला या सर्व मजल्यांचे स्लॅब एकावर एक कोसळून तळमजल्यावरील पलॅटमध्ये स्लॅबचा ढिगारा पडला. 

या दुर्घटनेत क्षतीग्रस्त झालेल्या पाच मजल्यावरील एकूण ८ रहिवाशी ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते. यावेळी महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेऊन चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या सात जणांची सुटका केली होती. मात्र, पाचव्या मजल्यावर राहणारा तरुण व्यंकटेश नाडर (३१) या रहिवाशाचा ढिगाऱ्याखाली दबून गेल्याने मृत्यू झाला होता. त्याला देखील नंतर ढिगाऱ्यायातून बाहेर काढण्यात आले होते. या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने जिमी पार्क संपूर्ण इमारत रहिवासमुक्त (रिकामी) करण्यात आली येऊन या इमारतीतील सर्व कुटुंबांची विविध ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदरची दुर्घटना घडून एक वर्ष पूर्ण होत नाही तोच आता नेरुळ, सेवटर-६ मधील तुलसी भवन इमारतीत स्लॅब कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे नवी मुंबई मधील जुन्या इमारतींच्या स्ट्रवचरल ऑडीटचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून वाशी खाडीपुलाची पाहणी