भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान- ३ मोहीमचे फडके नाट्यगृहात प्रक्षेपण

पनवेल महापालिकेच्या १० शाळांमध्येही डिजीटल बोर्डवरती चांद्रयान- ३ प्रक्षेपणाचा कार्यक्रम

पनवेल : आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वकांक्षी चांद्रयान- ३ मोहीमचे(chandrayaan ३) आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिकेने आज रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात चांद्रयान- ३ स्पेसक्राफ्ट चांद्रभूमीला स्पर्श प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचा चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यारिता आयुक्त  गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार फडके नाट्यगृहामध्ये मोठ्या स्क्रीनवरती प्रक्षेपण करण्यात आले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांद्रयानचे यशस्वी लॅण्डिंग होताच टाळ्यांचा गडगडाट करुन आनंद व्यक्त केला.

महापालिकेच्या १० शाळांमध्येही डिजीटल बोर्डवरती चांद्रयान- ३ स्पेसक्राफ्ट चांद्रभूमीला स्पर्श प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील मुलांनीही चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग होताना पाहण्याचा आनंद घेतला.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रायगड जिल्ह्यात सर्व रुग्णाची नोंद खारघर मधील ‘आपला दवाखाना'मध्ये