महापालिकेच्या पर्यावरणशील प्रकल्पांची पाहणी

 

जपान मधील ‘ओसाका सिटी'च्या अभ्यासगटाची नवी मुंबईला भेट
 
नवी मुंबई : आधुनिक शहराप्रमाणेच पर्यावरणशील इको सिटी अशी देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी जपान देशातील ‘ओसाका सिटी गव्हर्नमेंट'च्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास २३ ऑगस्ट रोजी भेट दिली. तसेच तुर्भे येथील ई-व्हेईकल चार्जीग स्टेशनच्या कार्यप्रणालीची पाहणी केली.

याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘ओसाका सिटी गव्हर्नमेंट'चे अधिकारी ओकामोटो, कटाओका, ग्लोबल इन्व्हायरोमेंट सेंटर जपानच्या अधिकारी अकीको डोई, नावो नाकाजिमा आणि ‘ओसाका सिटी जपान'चे भारत देशातील प्रतिनिधी अंशुमन नेल बासू, दुभाषक डिंपल यांचे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वागत केले.

 पर्यावरणाच्या अनुषंगाने अत्याधुनिक कार्याप्रणाली आणि प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने जपान मधील ओसाका सिटी गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून पर्यावरण, किनारपट्टी आणि बंदर विकास तसेच स्मार्ट सिटी विषयाच्या अनुषंगाने ‘ओसाका सिटी गव्हर्नमेंट'चे अभ्यासगट विविध भागाना भेटी देत पाहणी करुन माहिती जाणून घेत आहेत.

या अनुषंगाने ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या वतीने नवी मुंबई महापालिकेचे ई-व्हेईकल चार्जीग स्टेशन तसेच तळोजा एमआयडीसी मधील फिश प्रोसेसिंग आणि फुड प्रोसेसिंग युनिटला भेट देण्याच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच ‘महाराष्ट्र प्रदुषण निंयत्रण मंडळ'चे प्रादेशिक अधिकारी सतिश पडवळ आणि सह-प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, सचिन आरकड, विक्रांत भालेराव, आदि उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबई शहरातील स्वच्छता आणि सुशोभिकरणाने प्रभावित झाले असल्याचे अभिप्राय जपान मधील ‘ओसाका सिटी गव्हर्नमेंट'च्या अधिकाऱ्यांनी व्यवत केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान- ३ मोहीमचे फडके नाट्यगृहात प्रक्षेपण