पनवेल महापालिका तर्फे गणेश उत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना

पनवेल महापालिकेच्या वतीने गणेश उत्सव मंडपासाठी ऑनलाईन परवाना पध्दत सुरु

पनवेल ः पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सव मंडपासाठी ऑनलाईन परवाना पध्दत सुरु करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या वतीने शासन निर्णयाप्रमाणे परवानगी विनाशुल्क आकारण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील गणोशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी प्ूूज्ेः//ेस्ीीूज्स्म्.म्द.ग्ह/ अशी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी सदर सेवेचा लाभ घ्ोण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आले आहे.

यावर्षी १९ सप्टेंबर २०२३ पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. गणेशोत्सवानिमित्त कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांसाठी तातडीने परवाना देण्यासाठी महापालिका तर्फे ऑनलाईन पध्दतीने एक खिडकी योजना अमंलात आणली आहे.  

पनवेल शहरातील रस्त्यांवर सार्वजनिक मंडळांच्या वतीने गणेशोत्सव समारंभाच्या वेळी मंडप उभारले जातात. रस्त्यावर, पादचारी मार्गावर खड्डे खोदल्याने रहदारीस, वाहतुकीस, पादचाऱ्यांना अडचण निर्माण होवून वाहतुकीस अडथळा होत असतो. अशा पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या मंडप आणि तत्सम रचना महापालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय उभारता येत नाही. तसेच सदर ठिकाणी महापालिकेच्या पूर्वपरवानगी शिवाय जाहिरात फलक, पलेक्स लावण्यास मनाई आहे. यासाठी पनवेल महापालिका तर्फे गेल्या दोन वर्षापासून एक खिडकी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वेबसाईटवर ी सिटीझन सर्व्हिस यामधून सर्व मंडळांना मंडप परवानगी देण्यात येते. तसेच प्ूूज्ेः//ेस्ीीूज्स्म्.म्द.ग्ह/ या वेबसाईटवर गेल्यास मंडप परवानगी देण्यात येत आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील सार्वजनिक उत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी सदर वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ॲप्लीकेशन नोंदवल्यास, उत्सवाच्या वेळी तात्पुरत्या स्वरुपात मंडपास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त गणेश शेटे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची काही प्रमाणात वेळेची बचत होणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिघा रेल्वे स्थानक महिना अखेरपर्यंत सुरु करण्याची मागणी