नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध उपक्रमांचे पोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी नवनवीन उपक्रम घेतले हाती

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेले पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. यातील एम पोलीस ऍप, आय बाईक, यथार्थ, नेल्सन प्रणाली, टेक्नॉलॉजी सेल, अद्यावत मिटींग हॉल आदी उपक्रम त्यांनी सुरु केले आहेत. या उपक्रमांचे उद्घाटन मंगळवारी राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. हे सर्व उपक्रम मिशन कन्व्हीक्शन अंतर्गत सुरु करण्यात आले असुन तपासाचा दर्जा उंचावण्याबरोबरच गुणवत्तापुर्ण पुरावे प्राफ्त करणे, न्यायालयातील खटल्यावर पर्यवेक्षण ठेवून जास्तीत जास्त दोषसिध्दी मिळवणे हे या उपक्रमांचा उद्देश असल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांच्या करीता एम पोलीस हे ऍप तयार करण्यात आले असुन सदर ऍपद्वारे सेवापटातील नोंदी, वेतन पावत्या, रजा, बक्षिसे व शिक्षा तसेच महत्वाचे आदेश व सूचना तसेच अभ्यांगताच्या नोंदी, Îुटी बुक, ई पैरवी, पोलीस कल्याण योजना याबाबतची माहिती सर्व अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ ऑनलाईन प्राफ्त होणार आहेत. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आपल्या सेवेसंदर्भातील तक्रारी व त्यावर झालेली कार्यवाही तसेच पोलीस कल्याण योजनांची माहिती व विविध प्रकारचे प्रशिक्षणे यांचीही माहिती मिळणार आहे. आयजीएमआरएस ही नाविन्यपुर्ण प्रणाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणार असुन या प्रणालीद्वारे जनतेच्या तक्रार अर्जाची नोंद घेवुन मोबाईल द्वारे अर्ज चौकशीच्या सद्यस्थितीची माहिती संदेशाद्वारे वेळोवेळी तक्रारदार यांना देता येणार आहे.

त्याचप्रमाणे शास्त्राsक्त पध्दतीने तपास व्हावा व कोणतेही पुरावे नजरेतुन सुटु नये या उद्देशाने आय बाईक ही संकल्पना राबविण्यात येत असुन नवी मुंबई आयुक्तालयात 6 आय बाईक व पुरावे गोळा करण्यासाठी लागणारे सर्व अद्यावत साधनांनी परिपुर्ण किट प्रशिक्षीत अंमलदारांना पुरविण्यात आले आहेत. याचे लोकार्पण ही पोलीस महासंचालक रजनिश शेठ यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी व दर्जेदार व गुणवत्तापुर्वक तपास करुन गुन्हयाचा तपास जलद गतीने पुर्ण करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नेल्सन प्रणाली राबवण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक तपासी अंमलदार प्रत्येक महिन्यामध्ये एका गुन्हयाचा तपास करणार आहे. तसेच नवीन तपासी अंमलदारांना प्रशिक्षीत केल्याने गुन्हयांची निर्गती तात्काळ होणार आहे. त्यामुळे तपासीक अमलदारांची संख्या वाढणार असल्याने प्रत्येक तपास शास्त्राsक्त पध्दतीने व जलद गतीने पुर्ण होऊन गुन्हयांची निर्गती तात्काळ होणार आहे. गुह्यांच्या तपास कामात तंत्रज्ञानाचा वापर करुन पंचनामे जबाव, इत्यादीची नोंद यथार्थ प्रणालीद्वारे करुन दृक श्राव्य पुराव्याची विश्वासार्हता वाढविण्यास तसेच तांत्रिक दृष्टया भक्कम पुरावे कोर्टात सादर करण्यास मदत होणार आहे.
 

यावेळी पोलीस महासंचालकांच्या हस्ते पोलीस कल्याण योजनेतील विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन तसेच नवी मुंबई पोलीस दलाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस दलात राबविण्यात येणारे विविध लोकोपयोगी उपक्रम, घडलेले गुन्हे, उघड केलेले गुन्हे, गुन्हे प्रतिबंध व आयुक्तालयाचे डिजीटायझेशन आदी उपक्रमांची माहिती कार्यक्रमात दिली. सदर उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करणाऱया मान्यवरांचा सत्कार पोलीस महासंचालकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील या कार्यक्रमास नवी मुंबई दलातील वरिष्ठ अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलीस दलात आय बाईक झाल्या कार्यान्वित