सुमारे ४ हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत ; व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत 

जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

उरण : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.यामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार आहे.अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे 

    केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क शुन्यावरुन थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत.शनिवारी  दिनांक १९ आॅगस्ट 2023 राेजी केंद्र सरकारच्या निर्णया आधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०- ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते. मात्र कस्टम विभागाने कांद्याचे कंटेनर होल्डवर ठेवले आहेत. तर शेकडो कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत.

तर जेएनपीए अंतर्गत असलेल्या विविध बंदरात आणि विविध कंटेनर यार्डमध्ये महाराष्ट्रातुन विविध ठिकाणांहून निर्यातीसाठी आलेले सुमारे २०० कंटेनर होल्डवर ठेवण्यात आले आहेत.या कंटेनर कार्गोमध्ये निर्यातीसाठी पाठविण्यात आलेला सुमारे ४हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदारांकडून मिळत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध उपक्रमांचे पोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन