नेरुळ मधील तानाजी मालुसरे उद्यानात ‘काँग्रेस'तर्फे सफाई अभियान ​​​​​​​

क्रीडांगणावर मुलांना खेळताना पाहून केलेल्या परिश्रमाचे सार्थक - रविंद्र सावंत


नवी मुंबई : काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ याचा प्रत्यय नेरुळ मधील रहिवाशांना अनुभवयास मिळत आहे. नेरुळ, सेक्टर-६ मधील सिडको वसाहतीतील तानाजी मालुसरे क्रीडांगणावर वाढलेल्या जंगली गवतामुळे परिसरातील मुलांना खेळण्यास मैदान नव्हते. ‘काँग्रेस'चे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहभागातून तीन दिवस स्वच्छता अभियान राबवून क्रीडांगण स्वच्छ करण्यात आले. यानंतर २० ऑगस्ट रोजी विभागातील मुले या क्रीडांगणावर खेळण्यास परतल्यावर रहिवाशांनी रविंद्र सावंत आणि ‘काँग्रेस'चे सारसोळे गांव, नेरुळ सेक्टर-६ वॉर्ड क्र.८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांचे आभार मानले.

अडीच महिन्यांपासून नेरुळ, सेक्टर-६ मधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रीडांगणावर जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले होते. त्यामुळे विभागातील मुलांना खेळण्यास मैदानच नसल्याने लहान मुले घरातच मोबाईल खेळण्यास मुले व्यस्त राहू लागली. परिसरातील रहिवाशांनी याबाबत मॉर्निग वॉकसाठी येणारे ‘काँग्रेस'चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांच्याकडे तक्रार करत मैदानाची सफाई करण्याची मागणी केली होती. रहिवाशांची समस्या जाणून घेतल्यावर जीवन गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १२, १९ आणि २० ऑगस्ट असे तीन दिवस सफाई अभियान राबवित क्रीडांगणावरील सर्व जंगली गवत काढून टाकले. यानंतर २० ऑगस्ट रोजी ११ वाजता क्रीडांगण स्वच्छ असल्याचे पाहिल्यावर विभागातील मुले क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यासाटी जमा झाली. सदर सफाई अभियानात ‘काँग्रेस'चे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत, जीवन गव्हाणे यांनी स्वतः क्रीडांगणामध्ये बराच वेळ मशीन चालवून जंगली गवत हटविले. यावेळी रोहन इंगवले, सनी डोळस, गणेश इंगवले यांनीही सफाई अभियानात आपले योगदान दिले. समाजसेवक तुकाराम टावरे यांनी दोन दिवस स्वतः उपस्थित राहून सफाई अभियानात सफाई झालेल्यांना प्रोत्साहित केले. स्वाती इंगवले यांनी सफाई अभियानात सहभागी झालेल्या रहिवाशांच्या अल्पोपहाराची व्यवस्था पाहिली. अखेरीस लहान मुलांना क्रीडांगणावर खेळताना पाहून मैदान स्वच्छ करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले असल्याची प्रतिक्रिया रविंद्र सावंत यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्वच्छ सर्वेक्षण'च्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी सूचनापेटी