करंजा बंदरातील मासेमारी करणारा व्यवसायिक सुखावला

मासळीची आवक वाढल्याने करंजा बंदरातील मासेमारी करणारा व्यवसायिक सुखावला 

  उरण : चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ७५० मासेमारी करणारे व्यावसायिक हे करंजा बंदरातून आप आपल्या मच्छीमार नौका मधून  समुद्रात मासेमारी करण्याचा व्यवसाय करत आहेत.अशा मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे मासे मिळत असून वाढीव भाव ही मिळत आहे. त्यामुळे या बंदरातील मासेमारी करणारा व्यवसायिक सध्या सुखावला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शासनाने १ जुन ते ३१ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी इतर बंदरात करण्यात आली. मात्र रायगड - उरण मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी तथा परवाना अधिकारी यांच्या देखरेखीखाली करंजा बंदरात राजरोसपणे बंदी काळातही मासेमारीचा व्यवसाय सुरू होता. त्यातच मागील महिन्यात केंद्रिय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी करंजा बंदराला भेट देऊन या परिसरातील मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांना विविध शासकीय योजनांची माहिती करून देत सदर योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते.

मत्स्य विभाग तथा परवाना अधिकारी यांच्या देखरेखीखाली मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांनी अनेक मच्छीमार सोसायटीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातच सध्या करंजा बंदरातून समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या नौका मधिल व्यवसायिकांच्या जाळ्यात समुद्रातील मोठी कोळंबी, छोटी कोळंबी ,पापलेट, सुरमई, हलवा, माकुळ, रावस, बांगडा, बळा, मुशी, बोंबील व जिताडा सारखी इतर जातीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळत असून त्यांना योग्य दर मिळत असल्याने करंजा बंदरातील मासेमारी करणारा व्यवसायिक सुखावला असल्याचे चित्र करंजा बंदरात पहावयास मिळत आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ मधील तानाजी मालुसरे उद्यानात ‘काँग्रेस'तर्फे सफाई अभियान ​​​​​​​