तीन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने केलीअटक

घणसोलीत बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेले तीन बांग्लादेशी नागरीक अटकेत    

नवी मुंबई  : घणसोली सेक्टर-7 मधील झोपडपट्टीत बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या तीन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबईतील चारकोप युनिटने गत शुक्रवारी अटक केली आहे. कमल हुसेन अब्दुल शेख (27), मोहम्मद मिठु युसुफ खान (48) व सिकंदर अकील मुल्ला (54) अशी या तिघांची नावे असून मागील दोन वर्षापासून हे तिघेही सदर ठिकाणी बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे आढळुन आले आहे.  

या कारवाईत अटक करण्यात आलेले तिघेही बांग्लादाशी नागरीक असून ते घणसोली सेक्टर-7 मध्ये झोपडपट्टीत बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबईतील चारकोप युनिटला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने गत गुरुवारी मध्यरात्री रबाळे पोलिसांच्या मदतीने पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घणसोली सेक्टर-7 मधील झोपडपट्टीत छापा मारला. यावेळी सदर ठिकाणी तीन बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्यांनी बांग्लादेशातून विनापासपोर्ट वैध कागदपत्राशिवाय घुसखोरीच्या मार्गाने बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचे आढळुन आले. तसेच ते घणसोली सेक्टर-7 मध्ये दोन वर्षापासून वास्तव्यास असल्याचे आढळुन आले. त्यानंतर पोलिसांनी तिघां विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल त्यांना अटक केली आहे.     

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करंजा बंदरातील मासेमारी करणारा व्यवसायिक सुखावला