पनवेल मध्ये अनेक ठिकाणी लिटरबिन्सची दुरावस्था

पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांवर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे लिटर बीन्स तुटलेल्या अवस्थेत


नवीन पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांवर लावण्यात आलेले ओला आणि सुका कचऱ्याचे अनेक ठिकाणचे लिटर बीन्स तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे लिटर बीन्स लावून काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहेत. पनवेल महापालिका हद्दीत महानगर गॅस आणि इंडियन ऑईल तर्फे ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी स्टीलचे लिटर बीन्स लावण्यात आले आहेत. मात्र, बऱ्याचशा ठिकाणी लिटर बीन्स गायब झाले असून त्यावर पनवेल महापालिकेच्या वतीने देखरेख आणि लक्ष ठेवायला हवे होते. मात्र, तसे न झाल्याने सदर लिटर बीन्स गायब झाले आहेत. लिटर बीन्स चोरट्यांनी चोरुन नेले की भंगार गोळा करणाऱ्यांनी पळवून नेले? याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, महापालिका हद्दीत लावण्यात आलेल्या लिटर बीन्सची जबाबदारी महापालिकेची असल्याचे नागरिकांनी सांगितले.

ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी पनवेल महापालिका हद्दीत लिटर बीन्स लावण्यात आले आहेत. याबाबत पनवेल महापालिकेकडे खर्चाबाबत विचारणा केली असता सदर लिटर बीन्स महानगर गॅसच्या मार्फत लावण्यात आले आहेत. त्याचा खर्च आमच्याकडे नसून किती लिटिलबीन्स बसवण्यात आले आणि त्यांची सध्याची स्थिती काय? ते कोणकोणत्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत? याची माहिती महापालिकेकडे नसल्याचे सांगण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इर्शाळवाडी येथील तत्पर मदतकार्याची दखल